Saturday, May 30

Tag: let us communicate in Marathi only

Superintendent of Police Suraj Gurav : मराठीचा अभिमान जपू या ; मराठीतच संवाद साधू या – अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव

Superintendent of Police Suraj Gurav : मराठीचा अभिमान जपू या ; मराठीतच संवाद साधू या – अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मराठी साहित्यातील लखलखते नक्षत्र आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या हस्ते जिल्हा ग्रंथालयात विविध विषयांवरील ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रंथालयात मराठी साहित्य, स्पर्धा परीक्षा, इतिहास, विज्ञान आदी विविध विषयांवरील ग्रंथांचे आकर्षक प्रदर्शन मांडण्यात आले होते. यावेळी बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगून दैनंदिन व्यवहारात मराठीतच संवाद साधण्याचे आवाहन केले. मराठीतील मान्यवर लेखक व कवी यांचे स्मरण ठेवून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासोबतच अवांतर वाचनाची सवय जोपासावी, असे प्रतिप...
error: Content is protected !!