Homeक्राईमNanded Crime News : नांदेडमध्ये भर दिवस तरुणीला दोघांनी नेल जबरीने उचलून

Nanded Crime News : नांदेडमध्ये भर दिवस तरुणीला दोघांनी नेल जबरीने उचलून

नांदेड| शहरात एक धक्कादायक प्रकार घडला रेल्वे स्टेशन परिसरात, दोन युवकांनी एका मुलीला भर दिवसा उचलून नेते आणि जबरदस्तीने अपहरण केले. हा प्रकारचं सिसिटीव्ही आणि सोशल मीडिया मध्ये व्हायरल झाला आहे .

IMG 20250731 094104 Nanded Crime News : नांदेडमध्ये भर दिवस तरुणीला दोघांनी नेल जबरीने उचलून

व्हिडिओमध्ये मुलीला जबरदस्तीने पकडून दुचाकीवर उचलण्यात नेताना दिसते आहे, ती जोरदार प्रतिकार करत आहे पण अपहरण करणारे लोक थांबत नाहीत . या घटनेचे साक्षीदार अनेक होते, परंतु फक्त एक व्यक्ती व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसत आहे; अन्य नागरिकांनी काहीच हस्तक्षेप केलेले नाही.

IMG 20250731 094114 Nanded Crime News : नांदेडमध्ये भर दिवस तरुणीला दोघांनी नेल जबरीने उचलून

घडामोड लक्षात येताच नांदेड पोलिसांनी ताबडतोब कारवाई सुरू केली. पोलीस अधिकाऱ्यांनी ताबडतोब आरोपींचा पाठलाग सुरू केला आणि किशोरीला सुरक्षितरीत्या वाचवले अशी माहिती एसपी अबिनाश कुमार यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की; त्या वेळी पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते आणि ते लगेच मागोवा घेतल्याने, आरोपींनी मुलीला रस्त्यावरच फेकून पळन जाण्यास भाग पाडले आणि ते फरार झाले असून, पोलिसांनी या प्रकाराला गंगाभीर्याने लक्षात घेऊन व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवून दोन्ही आरोपीना रात्री ११ वाजता अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली डी. वाय. एस. पी. नायक यांनी आपल्या सहकार्यांसह हि कार्यवाही केली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments