HomeनांदेडAnup Patil inspected : उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांनी शहापूर येथील पूरग्रस्तांची पाहणी...

Anup Patil inspected : उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांनी शहापूर येथील पूरग्रस्तांची पाहणी केली

देगलूर, गंगाधर मठवाले| तालुक्यातील शहापूर गाव परिसरात आलेल्या पुरामुळे अनेक नागरिकांना विस्थापित व्हावे लागले आहे. या पूरग्रस्तांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी देगलूरचे उपजिल्हाधिकारी अनुप पाटील स्वतः शहापूर येथे दाखल झाले.

पूरग्रस्तांसाठी विठ्ठलेश्वर मंगल कार्यालय, आर्य समाज मंदिर तसेच जिल्हा परिषद हायस्कूल शहापूर येथे निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी उपजिल्हाधिकारी यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.

शहापूरातील सार्वजनिक गणेश मंडळ जय भवानी गणेश मंडळ, आपला गणेश मंडळ, दुर्गा गणेश मंडळ, पंचवटी गणेश मंडळ तसेच दानशूर नागरिकांच्या मदतीने पूरग्रस्तांना सकाळचा नाश्ता, दुपारचे व संध्याकाळचे जेवण या स्वरूपात सोयीसुविधा पुरवल्या जात आहेत.

याशिवाय शहापूर सोबतच नरगल येथील पूरग्रस्तांसाठीही शिजवलेले अन्न नेऊन पुरवले जात आहे. या कार्याचे उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांनी कौतुक केले असून, गावकरी व मंडळाच्या सेवाभावी कामाची प्रशंसा व्यक्त केली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments