श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील प्रभारी कुषी अधिकारी किनवट तर कृषी सेवक तालुक्याच्या ठिकाणावरून गाडा हाकत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणा मुळे तालुक्यात कृषी योजनेचा बट्ट्याबोळ होत असून अनेक शेतकरी कृषी विषयक माहिती,शासकीय योजनेपासून वंचित असल्याचा आरोप तालुक्यातील शेतकऱ्याकडून होत आहे
तालुक्यात योजनेची माहिती शेतकऱ्यांना पुरवली जात नाही.कुषी कार्यालय भाड्याच्या घरात शहराच्या बाहेर असल्याने कर्मचारी कधी येतात-जातात याकडे कोणाचेही लक्ष नाही,याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याची खंतही शेतकऱ्यानी व्यक्त केली आहे. तालुक्याचा नदीकाठील भाग सोडला तर बहुतांश शेती कोरडवाहू असल्याने शासनाच्या सुधारित तंत्रज्ञानाच्या आधारावर येथील शेतकऱ्यांना अनेक योजना शासन स्तरावर राबविल्या जातात मात्र या सर्व योजनेची प्रत्यक्षात योग्य प्रकारे अंमलबजावणीची जबाबदारी ज्या शासकीय प्रतिनिधी वर असते, ते कृषी विभागाचे अधिकरी, मंडळ अधिकारी, कृषी सेवक सैराट असल्याची खंत शेतकरी सांगतात.
तालुक्यातील कुपटी,बोरवाडी गुडवळ,पानोळा तांदळा,वानोळा सारख्या अनेक दुर्गम व डोंगराळ भागातील शेतकऱ्यांसाठी निवडलेला महिना महिना शेतकऱ्यांच्या संपर्कात राहत नसून कृषी सेवक हा तालुक्यातुन आपल्या पदाचा कार्यभार पाहतात एखाद्या शेतकऱ्याने दूरध्वनीवरून माहिती विचारल्यास फोन उचलत नाहीत,उद्धटपणे वागणूक देत शेतकऱ्याशी गैरवर्तणूक करणाऱ्या या कर्मचाऱ्यावर वरिष्ठाचे नियंत्रण नसल्याने या भागातील शेतकरी या कर्मचाऱ्यांचा वैताग करीत असल्याची अनेक शेतकऱ्यांनी कैफियत मांडली आहे योजनेच्या नावावर शेती शाळा घेऊन प्रशिक्षणाचा निधी अधिकारी व कर्मचारी घशात घालण्याचा प्रकार या आधीही तालुक्यात झाले असल्याचा आरोप शेतकऱ्याकडून केला जात आहे.
प्रत्यक्षात प्रशिक्षणात शेतकऱ्याची उपस्थिती नगण्य असताना सुद्धा उपस्थिती अधिकची दाखवून तसा अहवाल वरिष्ठाकंडे सादर करून निधी हडपण्यांचा प्रकार बिनबोबटपणे येथे सुरू असून जे शेतकरी शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्राची जुळवाजुळ करतात अशा अनेक शेतकऱ्यांना या विभागाचे लाभ मिळत नसल्याचेही शेतकऱ्यानी म्हटले आहे. याकडे जिल्हा कृषीअधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी शेतकऱ्यांनी मागणी आहे.