श्रीक्षेत्र माहूरगड, राज ठाकूर। आनवाणी हातात निशान अनू मुखाने दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या ,हो “देवा दत्ता दत्ता,देवा दत्ता दत्ता” असा गजर माहूर गडावर सुरू आहे सभोवतालच्या जिल्हयासह तेलंगना, महाराष्ट्र राज्यातून हजारों संख्येने भाविकांचे पालख्यासह आगमन होत आहे.
गडावरील विविध मंठानवर विघुत रोषनाई,रंग रागोंटी व सजावट करण्यात आली आहे संभोताल जंगलात असलेल्या दत्त शिखर मंदिर, चक्रधर स्वामी व एकमुखी दत्तात्रेय ( देवदेवेश्वर) मंदिर, साईनाथ महाराज (वसमतकर), श्याम भारती महाराज (केरोळी फाटा) वडगुंफा मठ,दत्ता महाराज वनदेव,सर्वतिर्थ, बळिराम महाराज मठ,लिने महाराज,चंचल भारती, या सह तात्पुरत्या राहुट्या अदी ठिकाणी दत्तनाम स्मरणाचे तथा उद्दघोषणाने सारा असमंत दुमदुमून निघत आहे. माहूर गडावर नवरात्र, परिक्रमा यात्रा नारळी पोर्णिमा , दत्त जयंती ह्या यात्रेत मोठ्या प्रमानात भाविक दाखल होतात दत्त जयंती निमित्त ग्रामिण भागातील भाविक आपल्या परिवारासह दर्शना साठी गडावर दाखल होतात.
दत्तशिखर संस्थान, माहूरगडावरील दत जल्म सोहळा कार्यक्रम पुढील प्रमाने मार्गशिर्ष शु.०७ रविवार दि.०८ डिसेंबर रोजी घटस्थापना व निशान पुजा, (एकादशी) बुधवार दि.११ रोजी श्री दत्त महाराजाची पहिला पालखी प.पु. महंत महाराजाच्या उपस्थिती पालखी सोहळा सुरूवात एकादशीला किर्तन पालखी झाल्यानंतर देवकते महाराज व संच (छत्रपती सभांजीनगर), (व्दादशी) गुरूवार दि. १२ श्री दत्त महाराजाची दुसरी पालखी किर्तन सोहळा कासवा समोर देवकते महाराज व संच,(त्रयोदशी) शुक्रवार दि.१३ श्री दत्त महाराजाची तिसरी पालखी गादी जवळ किर्तन सोहळा संच देवकते महाराज,
(चतुर्दशी) शनिवार दि. १४ श्री दत्त महाराजचा अभिषेक प.पु. महंत महाराजाच्या हस्ते व सभामंडपामध्ये दत्त जन्म सोहळा व किर्तन व दत्त जन्म अध्याय वाचन ऋषिकेश जोशी माहूर व देवकते महाराज व संच श्री दत्त महाराजाची (चौथी पालखी), (पौर्णिमा) रविवार दि.१५, रोजी श्री दत्त महाराजाची पाचवी पालखी, (पौर्णिमा) सोमवार दि.१६ प.पु. महंत महाराजाच्या उपस्थितीत कार्यक्रम दहिहांडी सोहळा व किर्तन सोहळा राधा, कृष्ण, बळीराम, दि. १७ प.पु. महंत महाराजाच्या उपस्थितीत सकाळी ६ वा. काकडा आरतीने संपुर्ण कार्यक्रमाची सांगता.होणार असल्याची माहीती श्री दत्तशिखर संस्थान, यांनी दिली आहे.