HomeनांदेडKailas Tekadi Mahadev ; श्री.शिखर कैलास टेकडी दयाळ धानोरा येथे लाखो भाविकांनी...

Kailas Tekadi Mahadev ; श्री.शिखर कैलास टेकडी दयाळ धानोरा येथे लाखो भाविकांनी श्री.नर्मदेश्वर मंदिराचे घेतले दर्शन – NNL

शिवणी, भोजराज देशमुख।किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील दयाळ धानोरा येथील श्री शिखर कैलास टेकडी येथे २२ व्या वार्षिक उत्सव निमित्ताने दि.०५ डिसेंबर ते ०९ डिसेंबर २०२४ पर्यंत संत श्री लिंबाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यात दि.०५ डिसेंबर पासून होम हवन,लक्ष्मण शक्ती पूजा,महापूजा,महा आरती व महाप्रसादाचे आयोजन मंदिर संस्थान कडून करण्यात आले होते.या वेळी तेलंगणा महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील लाखो भाविक नर्मदेश्वर मंदिराचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतले आहे.

किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील डोंगराच्या कुशीत निसर्गरम्य वातावरणात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिखर कैलास टेकडी दयाळ धानोरा येथे दि.०५ ते ०९ डिसेंबर पर्यंत सतत चालणाऱ्या महोत्सवात विविध कार्यक्रमाचे समारोपन दि ०९ डिसेंबर रोजी ह.भ.प.भीमराव महाराज फुटानकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने व बालब्रम्हचारी सत्तगुरू रामराव बापू महाराज यांना भोग देऊन २२ व्या वार्षिक महोत्सवाची सांगता करण्यात आली.

IMG 20241210 WA0008 Kailas Tekadi Mahadev ; श्री.शिखर कैलास टेकडी दयाळ धानोरा येथे लाखो भाविकांनी श्री.नर्मदेश्वर मंदिराचे घेतले दर्शन - NNL

श्री.शिखर कैलास टेकडी महादेव मंदिरचे विश्वस्त संत लिंबाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या कीर्तन सोहळ्यात विश्व हिंदू परिषदचे उपाध्यक्ष सुरेश महाराज यांची उपस्थिती होती .तर दि.०८ डिसेंबर रविवार रोजी हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, दि.०७ डिसेंबर शनिवार रोजी तेलंगणा राज्यातील बोथ तालुक्याचे आमदार अनिल जाधव, कांग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र आडे व बोथ पंचायत समितीचे तुला श्रीनिवास यांनी व दि.०६ डिसेंबर रोजी भाजपाचे वरिष्ठ नेते सुधाकर भोयर सह सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रातील शेकडो मान्यवर श्री शिखर कैलास टेकडी येथील नर्मदेश्वर मंदिराचे दर्शन घेतले.

या शिखर कैलास टेकडीचा २२ व्या वार्षिक उत्सव यशस्वीतेसाठी तेलंगणा व महाराष्ट्र राज्यातील हजारो भाविकांनी सेवा समर्पित केले.तर कायदा सुव्यवस्था अबाधित रहावे या साठी महाराष्ट्र तेलंगणा राज्यातील पोलीस प्रशासन, वनविभाग , वनविकास महामंडळ, आरोग्य विभाग यांनी सेवा दिली.या वेळी श्री शिखर कैलास टेकडीचे विश्वस्त संत श्री.लिंबाजी महाराज यांच्या वतीने मंदिर संस्थान कडून सर्व शिव भक्तांचे आभार मानले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments