श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| बांगलादेश येथील हिंदूवर होत असलेल्या अनन्वित अत्याचारविरोधात माहूर तालूका सकल हिंदू समाजाद्वारे मंगळवार, १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कपीलेश्वर मंदिर परीसरात जनआक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकल हिंदू समाजाने या सभेत मोठ्या संख्येने सहभागी होत हिंदूंवरील अत्याचाराविरोधातील आक्रोश संवैधानिक मार्गाने व्यक्त केला.
बांगलादेशात हिंदू साधू,संत,नागरिक,मंदिर व संस्थांवर अमानुष अन्याय अत्याचार सुरू आहेत.त्या विरोधात सकल हिंदू समाज माहुरचे वतीने प.पू. चिंतामण भारती महाराज,बाळू महाराज काकाणी व गोपाल गुरे महाराज यांचे नेतृत्वात कपिलेश्वर मंदिराच्या प्रांगणातून काढण्यात आलेला भव्य आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.
१० डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार दिवस, या दिवसाचे औचित्य साधून, अत्याचारांचा जागतिक मानवाधिकार आयोगाने दाखल घ्यावी, तसेच हिंदुवरील हल्ले तात्काळ थांबवावेत या हेतूने सदर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात कांतराव घोडेकर,हिमालय राऊत,सौरभ भोपी,कृष्णा बेलखोडे, विकास कपाटे, वसंत कपाटे,ॲड.दिनेश येऊतकर,हर्षदीप दीक्षित,श्याम काण्णव,संतोष पवार, अनिल वाघमारे, विनोद सुर्यवंशी,सागर महामुने, विजय आमले,अपील बेलखोडे, पवन शर्मा,संतोष तामखाणे, संजय बनसोडे, अथर्व बेलखोडे,मनीष काण्णव,आदित्य काण्णव,नितेश राठोड,ज्ञानेश्वर कल्लेवाड,निळकंठ मस्के, राजू दराडे,सागर राठोड,देविदास पवार,
मनीष राठोड,अजय पवार,रोहित वाघमारे,शोभा महामुने,पद्मा गिऱ्हे,रंजना पाटील यांचेसह असंख्य हिंदू बांधवांनी सहभाग घेतला होता. भारत माता की जय,वंदे मातरम् व बांगला देशाचा निषेध करणाऱ्या घोषणांनी माहुर शहर दणाणून गेले होते.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेले निवेदन तहसीलदार डॉ.राजकुमार राठोड यांनी स्वीकारले. यावेळी पो. नि. शिवप्रकाश मुळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.