Against Atrocities in Bangladesh : बांगलादेशातील अत्याचाराविरोधात जनआक्रोश तहसिलवर धडकला -NNL
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| बांगलादेश येथील हिंदूवर होत असलेल्या अनन्वित अत्याचारविरोधात माहूर तालूका सकल हिंदू समाजाद्वारे मंगळवार, १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कपीलेश्वर मंदिर परीसरात जनआक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकल हिंदू समाजाने या सभेत मोठ्या संख्येने सहभागी होत हिंदूंवरील अत्याचाराविरोधातील आक्रोश संवैधानिक मार्गाने व्यक्त केला.
बांगलादेशात हिंदू साधू,संत,नागरिक,मंदिर व संस्थांवर अमानुष अन्याय अत्याचार सुरू आहेत.त्या विरोधात सकल हिंदू समाज माहुरचे वतीने प.पू. चिंतामण भारती महाराज,बाळू महाराज काकाणी व गोपाल गुरे महाराज यांचे नेतृत्वात कपिलेश्वर मंदिराच्या प्रांगणातून काढण्यात आलेला भव्य आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.
१० डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार दिवस, या दिवसाचे औचित्य साधून, अत्याचारांचा जागतिक मानवाधिकार आयोगाने दाखल घ्यावी, तसेच हिंदुवरील हल्ले तात्का...
