Saturday, May 16

तेलंगणा

A creative collection of intelligent, highly defined and functional skincare. Products are rich in natural actives …

Pawan Kalyan : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनीडला पवन कल्याण यांचा नांदेड दौरा

Pawan Kalyan : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनीडला पवन कल्याण यांचा नांदेड दौरा

नांदेड, तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड | आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनीडला पवन कल्याण हे रविवार, 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनीडला पवन कल्याण यांचं सकाळी 9.40 – श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळ, नांदेड येथे आगमन, 9.45 – हॉटेल सिटी सिंफनीकडे प्रयाण, 10.00 – हॉटेल सिटी सिंफनी येथे आगमन (राखीव) तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा भेट , 1.10 – गुरुद्वाराकडे प्रयाण, 1.20 ते 1.30 – राखीव, 1.30 ते 1.35 – दर्शन, 1.35 ते 1.50 – चौर साहिब सेवा व प्रसाद, 1.50 ते 1.55 – गुरुद्वारा समितीच्यावतीने सत्कार भव्य धार्मिक कार्यक्रम - 2.10 – ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम सोहळ्यास उपस्थिती, स्थळ: मोदी मैदान, नांदेड ✈️ परतीचा प्रवास - 4.00 – मोदी मैदानातून...
Agnimallanna jatrotsava : श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा संगम : श्री अग्निमल्लन्ना जत्रोत्सवाला भक्तीमय प्रारंभ

Agnimallanna jatrotsava : श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा संगम : श्री अग्निमल्लन्ना जत्रोत्सवाला भक्तीमय प्रारंभ

धार्मिक, तेलंगणा, नांदेड
निजामाबाद, एस नविनकुमार| जिल्ह्यातील नंदिपेठ, डोणकेश्वर मंडल अंतर्गत येणाऱ्या नडकुडा येथे दि. १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत ग्रामदैवत श्री श्री श्री अग्निमल्लन्ना यांच्या जत्रा महोत्सवाचे मोठ्या भक्तिभावात आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी पारंपरिक अग्निकळश शोभायात्रेने या पाच दिवसीय धार्मिक सोहळ्याला भव्य व भक्तीमय सुरुवात झाली. हलगीच्या तालावर, डोक्यावर प्रज्वलित अग्निकळश घेऊन हजारो महिला भाविकांनी सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. “श्रद्धा, संयम व समर्पण” यांचा प्रत्यय देणारी ही शोभायात्रा ग्रामसंस्कृतीचे जिवंत दर्शन घडवणारी ठरली. यात्रेनिमित्त पशुधनाची समृद्धी, भरघोस पर्जन्यवृष्टी, शेतीचा विकास व ग्रामकल्याण यासाठी भाविकांनी श्री अग्निमल्लन्ना देवाकडे सामूहिक प्रार्थना केली. शोभायात्रेत सहभागी भाविकांनी मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घालून दर्शन घेतले व दे...
DRM Pradeep Kamle’s surprise inspection : हिमायतनगर रेल्वे स्थानकावर डीआरएम प्रदीप कामले यांची अचानक पाहणी — नागरिकांच्या तक्रारींवर

DRM Pradeep Kamle’s surprise inspection : हिमायतनगर रेल्वे स्थानकावर डीआरएम प्रदीप कामले यांची अचानक पाहणी — नागरिकांच्या तक्रारींवर

नांदेड, तेलंगणा, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर (अनिल मादसवार) हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या अलीकडील भेटीनंतर हिमायतनगर रेल्वे स्थानकावरील विकासकामांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड डिव्हिजनचे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) प्रदीप कामले (DRM Pradeep Kamle's surprise inspection) यांनी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह हिमायतनगर रेल्वे स्थानकावर अचानक भेट देऊन पाहणी केली. अमृत संवाद योजनेअंतर्गत त्यांनी थेट प्रवाशांशी व शहरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व अडचणींचा आढावा घेतला. यावेळी रेल्वे स्थानकावरील कामे वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला कडक सूचना देण्यात आल्या. दोन वर्षांपासून काम संथगतीने हिमायतनगर स्थानकाच्या कायापालटासाठी अमृत भारत योजनेतून ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, गेली दोन वर्षे काम सुरू आहे. मात्र कामा...
Question mark on contractor : खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची अचानक पाहणी ; रेल्वे स्थानक ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह

Question mark on contractor : खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची अचानक पाहणी ; रेल्वे स्थानक ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह

नांदेड, तेलंगणा, महाराष्ट्र, हिंगोली
हिमायतनगर (अनिल मादसवार) हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर (MP Nagesh Patil Ashtikar's surprise inspection) यांनी हिमायतनगर रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या अमृत भारत योजनेतील तब्बल 42 कोटी रुपयांच्या कामाची बुधवार दिनांक 01 ऑकटोबर रोजी अचानक भेट देऊन पाहणी केली. काही दिवसांपूर्वी स्थानकाच्या कामात थातूरमातूर व अंदाजपत्रकातील गंभीर अनियमितता होत असल्याचे वृत्त नांदेड न्यूज लाइव्हने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन खासदारांनी आज थेट पाहणी केली असता अनेक उणीवा उघड झाल्या. बुधवारी दुपारी 2.30 वाजता हिमायतनगर रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणीत केली असता दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेले सिमेंट काँक्रीट फोडून पुन्हा निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. लोखंडी गजाळी व साहित्यात कमी दर्जा दिसून आला. कोरोना काळापासून सुरू असलेले शेडचे काम अद्याप अपूर्ण असून, इमारतींचे नूतनीकरण फक्त जुनी भिंत...
Work on Himayatnagar railway station : हिमायतनगर रेल्वे स्थानकाचे काम थातूरमातूर; ठेकेदाराचा बेफिकीर कारभार प्रवाशांच्या जीवाशी खेळ!

Work on Himayatnagar railway station : हिमायतनगर रेल्वे स्थानकाचे काम थातूरमातूर; ठेकेदाराचा बेफिकीर कारभार प्रवाशांच्या जीवाशी खेळ!

नांदेड, तेलंगणा, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| येथील रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र 42 कोटी रुपयांचा निधी खर्च होत असतानाही कामाची गती कासवाप्रमाणे आहे. ठेकेदाराकडून कामात गंभीर अनियमितता, निकृष्ट दर्जाचे साहित्य, तसेच प्रवाशांच्या सुरक्षेची पायमल्ली होत आसल्याचे उघडकीस येत असून, ठेकेदाराच्या नाकर्तेपणा बाबत प्रवासी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या हिमायतनगर रेल्वे प्लॅटफॉर्मवर सिमेंट काँक्रेटचे काम फोडून पुन्हा नव्याने निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे. कामामध्ये स्टील कमी जाडीचे वापरले जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. अंदाजपत्रकातील नियमाला बगल देत ठेकेदार सरळ मलिदा लाटत असल्याची प्रवाशांतून शंका व्यक्त केली जात आहे. जुन्या इमारतीला नव्याने बांधकाम करून “नूतनीकरण” दाखविण्याचा प्रकार सुरू असल्याचे आरोप होत असून, यातून ठेकेदा...
Special Trains : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नांदेड – तिरुचानूर – नांदेड विशेष गाड्या

Special Trains : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नांदेड – तिरुचानूर – नांदेड विशेष गाड्या

नांदेड, तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड| दिवाळी, दसरा व छठ या सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या वाढत्या गर्दीची सोय करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने नांदेड – तिरुचानूर – नांदेड दरम्यान विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या विशेष भाडे (साधारण भाड्याच्या 1.3 पट) दराने धावणार आहेत. गाड्यांचे वेळापत्रक : गाडी क्रमांक 07039 नांदेड – तिरुचानूर विशेष कालावधी : 16 सप्टेंबर 2025 ते 30 सप्टेंबर 2025 सुटण्याचा दिवस : प्रत्येक मंगळवार वेळ : सायंकाळी 4.50 वाजता नांदेड येथून सुटेल मार्ग : मुदखेड, बासर, निझामाबाद, अर्मुर, लिंगमपेट जग्तीयाल, करीमनगर, पेद्दपल्ली, जमिकुंता, वरंगल, मह्बुबाबाद, दोर्णकाल, खम्मम, मधीरा, विजयवाडा, तेनाली, चीराला, ओंगोल, नेल्लोर, रेणीगुंठा मार्गे गंतव्य : दुसऱ्या दिवशी सकाळी 11.30 वाजता तिरुचानूर येथे आगमन फेऱ्या : एकूण 3 गाडी क्रमांक 07040 तिरुचानूर – नांदेड ...
Manjara river : मांजरा नदी किना-यावरील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली,अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले

Manjara river : मांजरा नदी किना-यावरील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली,अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले

तेलंगणा, नांदेड, महाराष्ट्र
बिलोली/नांदेड, गोविंद मुंडकर| बिलोली तालुक्यात दि. २७ ऑगस्टच्या मध्यरात्री पासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्वच नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. अशातच तेलंगानातील निजामसागर धरणातून सोडलेल्या २७ गेटमधील निसर्गाच्या पाण्यामुळे बिलोलीच्या सिमेवरुन वाहणाऱ्या मांजरा नदीला पुर आला आहे. या पुरामुळे मांजरा व मन्याड नदी काठावर असलेल्या गावांसह हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नासाडी झाली आहे. धोक्याच्या पातळीवरून वाहणा-या मांजरा नदीच्या पुर परिस्थिती बाबत खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने मांजरा व मन्याड नदी काठावरील काही गावातील नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविले असून प्रशासन या पुर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. बिलोली तालुक्याच्या सिमेवरुन वाहणाऱ्या मांजरा व मन्याड नदी पात्राच्या पाणी पातळीत गेल्या दोन दिवसांत लक्षणीय वाढ झाली आहे. तेलंगणातील मांजरा नदी पात्राव...
Nizamsagar opened : निझामसागरचे २७ दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

Nizamsagar opened : निझामसागरचे २७ दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

तेलंगणा, नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
देगलूर/कामारेड्डी,अमृत गोजे, गंगाधर मठवाले| तेलंगणा राज्यातील कामारेड्डी परिसरात झालेल्या ढगफुटी पावसामुळे निझामसागर धरण काठोकाठ भरले आहे. त्यामुळे धरणाचे सर्व २७ दरवाजे उघडण्यात आले असून वाझरा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने मेदनकलूर गावात पाणी शिरले. परिणामी प्रशासनाने तात्काळ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. नदीकाठावरील शेळगाव, तमलूर, सागवी, उमरशेवाळा, शेकापूर या गावातील नागरिकांनी विधिवत गणेशपूजन करून रात्रीच गाव सोडून नातेवाईकांकडे आश्रय घेतला आहे. पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने नरगल इंग्लिश स्कूल (शहापूर), विठ्ठलेश्वर मंगल कार्यालय (शहापूर), सिद्धेश्वर मंगल कार्यालय (देगलूर) यांसह अन्य ५ ठिकाणी पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्रे उभारली आहेत. पूराच्या पाण्यामुळे करडखेड–उदगीर, बळेगाव–देगलूर, भोकसखेडा–नांदेड, लखा–वझरगा, तुपशेळगाव–कुरुडगी, नर...
Heavy rains in Kamareddy : कामारेड्डी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे वाहतूक ठप्प, जनजीवन विस्कळीत

Heavy rains in Kamareddy : कामारेड्डी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे वाहतूक ठप्प, जनजीवन विस्कळीत

तेलंगणा, नांदेड, लाइफस्टाइल
येल्लारेड्डी/कामारेड्डी, अमृत गोजे| कामारेड्डी जिल्ह्यातील येल्लारेड्डी शहरासह संपूर्ण मंडळात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. सततच्या पावसामुळे अनेक रस्ते तुटले असून, वाहतूक ठप्प झाली आहे. येल्लारेड्डी शहराबाहेरील वडेरा कॉलनी परिसरात येल्लारेड्डी–कामारेड्डी मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने वाहतूक बंद केली आहे. ब्राह्मणपल्ली गावाला पूर आल्याने रुद्रराम–येल्लारेड्डी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तसेच कोट्टल–लक्ष्मपूर पूल पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने तो धोकादायक ठरला असून प्रवाशांना तिथे न जाण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, येल्लारेड्डी शहरातील अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरल्याने नागरिक मोठ्या अडचणीत आले आहेत. सर्व मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी मध्यरात्री पासून सुरू असलेल्या मेघगर्जनेसह पावसामुळ...
Tirupati Balaji Temple : तिरुपती बालाजी मंदिरात भक्ताची ऐतिहासिक देणगी

Tirupati Balaji Temple : तिरुपती बालाजी मंदिरात भक्ताची ऐतिहासिक देणगी

तेलंगणा, धार्मिक
तिरुपती| आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात एका अज्ञात भक्ताने अपार श्रद्धा व्यक्त करत १२१ किलो सोने भगवान वेंकटेश्वराच्या चरणी अर्पण केले आहे. या सोन्याची बाजार किंमत तब्बल ₹१४० कोटी एवढी आहे. मंदिर प्रशासनाने या देणगीची पुष्टी केली असून, हे सोने धार्मिक सेवा व मंदिरातील विविध कार्यांसाठी वापरले जाणार आहे. मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी सांगितले की, या भक्ताने व्यवसायाची सुरुवात तिरुपतीत माथा टेकून केली होती. कालांतराने त्याने ६,०००–७,००० कोटींचा उद्योग उभा केला आणि यशाचे श्रेय श्री वेंकटेश्वर स्वामींना देत १२१ किलो सोन्याची देणगी दिली आहे. सध्या दररोज भगवान वेंकटेश्वराच्या मूर्तीला सुमारे १२० किलो सोन्याच्या दागिन्यांनी सजवले जाते. या भक्ताने त्याहून अधिक अर्पण करण्याचा संकल्प केला होता, जो आता पूर्ण झाला आहे. खरोखरच हा प्रसंग भक्ती, श्रद्धा व देवावरील निस्सीम प्रेमाचे ...
error: Content is protected !!