HomeनांदेडTicketless Passengers : रेल्वेत विनातिकीट प्रवाशांवर नांदेड विभागाचा दणका!

Ticketless Passengers : रेल्वेत विनातिकीट प्रवाशांवर नांदेड विभागाचा दणका!

विशेष तिकीट तपासणीत ५१९ प्रवासी दोषी; २.५३ लाखांचा दंड व भाडे वसूल

नांदेड, प्रतिनिधी |विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली. २० जुलै रोजी राबविण्यात आलेल्या या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत ५१९ प्रवासी विनातिकीट अथवा अनियमित प्रवास करताना आढळले. त्यांच्याकडून दंड आणि भाड्यापोटी तब्बल २ लाख ५३ हजार १०५ रुपये वसूल करण्यात आले.

या विशेष मोहिमेत ३१ स्क्वॉड तिकीट तपासनीस सहभागी झाले होते. पथकांनी २७ रेल्वेगाड्यांची सखोल तपासणी केली. सचखंड एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, नांदिग्राम एक्स्प्रेस, पनवेल एक्स्प्रेस, हडपसर एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, काचेगुडा एक्स्प्रेस आणि रायचूर एक्स्प्रेससह विविध महत्त्वाच्या गाड्यांमध्ये ही तपासणी करण्यात आली.

२८५ विनातिकीट प्रवाशांकडून २.०२ लाख वसूल – तपासणीदरम्यान विनातिकीट प्रवासाची २८५ प्रकरणे आढळली. या प्रकरणांतून २ लाख २ हजार ८६५ रुपये वसूल करण्यात आले. अनियमित प्रवासाच्या १७ प्रकरणांतून ११ हजार ७९० रुपये, तर बुक न केलेल्या सामानाच्या २१७ प्रकरणांतून ३८ हजार १०५ रुपये वसूल करण्यात आले.

रेल्वेचा महसूल बुडविणाऱ्यांवर कारवाई सुरूच – एकूण ५१९ प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई करत रेल्वे प्रशासनाने २ लाख ५३ हजार १०५ रुपयांची वसुली केली आहे. विनातिकीट किंवा अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आळा घालण्यासाठी तसेच रेल्वेच्या महसुलाचे संरक्षण करण्यासाठी अशा विशेष तिकीट तपासणी मोहिमा यापुढेही नियमितपणे राबविण्यात येणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने प्रवाशांना वैध तिकीट घेऊनच रेल्वे प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments