Homeनांदेडसाडेतीन शक्तिपीठ दुर्गा मंडळाचा स्तुत्य उपक्रम; भक्तीसोबत व्यसनमुक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा जागर!

साडेतीन शक्तिपीठ दुर्गा मंडळाचा स्तुत्य उपक्रम; भक्तीसोबत व्यसनमुक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा जागर!

मातीच्या शैलपुत्री देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना; भजन स्पर्धा, बालगरबा प्रशिक्षण आणि पोलिसांच्या मार्गदर्शनातून समाजप्रबोधन

हिमायतनगर (वाढोणा), अनिल मादसवार| हिमायतनगर शहरातील छत्रपती संभाजी नगर परिसरातील साडेतीन शक्तिपीठ दुर्गा मंडळाने धार्मिक उपासनेसोबत सामाजिक बांधिलकी जपत व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि जलसंवर्धनाचा संदेश देणारा स्तुत्य उपक्रम राबविला. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून मंडळाने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.

पर्यावरणपूरक नवरात्रोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने मंडळाच्या वतीने मातीपासून तयार केलेल्या शैलपुत्री देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. नऊ दिवस देवीची भक्तिभावाने उपासना करण्यात आली. दररोज सकाळी व सायंकाळी आरती, महापूजा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

FB IMG 1792595354976 साडेतीन शक्तिपीठ दुर्गा मंडळाचा स्तुत्य उपक्रम; भक्तीसोबत व्यसनमुक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा जागर!

नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी होमहवन, पूजन आणि धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर आयोजित भव्य महाप्रसादाने उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. या वेळी परिसरातील महिला, पुरुष, युवक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या उपक्रमाची माहिती नगरसेवक आशिष सकवान यांनी दिली. धार्मिक श्रद्धा जोपासतानाच समाजहिताचे उपक्रम राबविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नव्या पिढीला चांगले संस्कार देणे, हा मंडळाच्या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

FB IMG 1792595342358 साडेतीन शक्तिपीठ दुर्गा मंडळाचा स्तुत्य उपक्रम; भक्तीसोबत व्यसनमुक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा जागर!

या उपक्रमात मोहनराव देशपांडे, पिंटू चिंतावार, गजानन मांगूळकर, दत्तात्रेय दळवे, राहुल मोतेवार, शेखर मुंडावरे, उदय देशपांडे, भाऊराव ढोणे, श्रीनिवास चिंतावार, राजू चार्लेवार, सदाशिव दळवे, नितीन ढोणे, विकास ढोणे, सावन दळवे, दिनेश ढोणे, विजय दळवे, चंदू मारुडवार, भावडे सर, चंद्रकांत मादसवार, जितेंद्र जाधव सर, सुनील माळवे, बालाजी पांचाळ, गोविंद माने यांच्यासह छत्रपती संभाजी नगर परिसरातील सर्व महिला-पुरुष नागरिकांनी सहभाग नोंदविला.

FB IMG 1792595585113 साडेतीन शक्तिपीठ दुर्गा मंडळाचा स्तुत्य उपक्रम; भक्तीसोबत व्यसनमुक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा जागर!

भक्ती, संस्कार आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या साडेतीन शक्तिपीठ दुर्गा मंडळाच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा जागर घडवून आणण्याचा मंडळाचा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments