HomeनांदेडAshadhi Ekadashi : आषाढी एकादशीसाठी नांदेड–पंढरपूर विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीसाठी नांदेड–पंढरपूर विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या

२३ जुलैला नगरसुल–पंढरपूर विशेष गाडी; २४ जुलैची फेरी रद्द

नांदेड, प्रतिनिधी| आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे होणारी भाविकांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नांदेड–पंढरपूर–नांदेड विशेष रेल्वेगाडीच्या दोन फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. तसेच २३ जुलै रोजी नगरसुल–पंढरपूर विशेष रेल्वेची एक फेरी चालविण्यात येणार आहे.

नांदेड–पंढरपूर विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या
गाडी क्रमांक ०७६४५ नांदेड–पंढरपूर विशेष २६ जुलै आणि २ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता नांदेडहून सुटेल. पूर्णा, परभणी, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी आणि मोडनिंब मार्गे ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०७६४६ पंढरपूर–नांदेड विशेष २७ जुलै आणि ३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता पंढरपूरहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता नांदेड येथे पोहोचेल.

२३ जुलैला नगरसुल–पंढरपूर विशेष गाडी
गाडी क्रमांक ०७६३७ नगरसुल–पंढरपूर विशेष २३ जुलै रोजी रात्री ११ वाजता नगरसुलहून सुटेल. रोटेगाव, लासूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी टाऊन आणि कुर्डुवाडी मार्गे ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. या विशेष गाडीला २४ डबे असतील.

२४ जुलैची नगरसुल–पंढरपूर विशेष फेरी रद्द
दरम्यान, परिचालनविषयक अपरिहार्य कारणांमुळे २४ जुलै रोजी चालविण्यात येणारी नगरसुल–पंढरपूर–नगरसुल विशेष रेल्वेगाडी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०७६३१ नगरसुल–पंढरपूर विशेष (२४ जुलै) तसेच गाडी क्रमांक ०७६३२ पंढरपूर–नगरसुल विशेष (२५ जुलै) या दोन्ही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments