Homeक्राईममराठा सेवक त्रिशूल पाटील यांना सिंदखेड पोलिसांनी उचलले ? जरांगे पाटील समर्थक...

मराठा सेवक त्रिशूल पाटील यांना सिंदखेड पोलिसांनी उचलले ? जरांगे पाटील समर्थक व मराठा समाजात तीव्र संताप

श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहरे | मराठा सेवक तथा मनोज जरांगे पाटील समर्थक त्रिशूल पाटील यांना त्यांचे मूळ गाव वायफनी येथील निवासस्थानावरून कुटुंबीयांना पूर्वसूचना न देता सिंदखेड पोलिसांनी दि. २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ताब्यात घेतल्याची वार्ता माहूर तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली आणि एकच खळबळ उडाली आहे.याबाबत पत्रकारांनी सिंदखेड पोलिसांकडे माहिती विचारली असता पोलिसांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही. उलट आम्ही अटकही केलेली नाही आणि चौकशीसाठी ताब्यातही घेतलेले नाही. अशी खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याबाबत पत्रकार जयकुमार अडकिने यांचे सह अनेक जरांगे पाटील समर्थकानी सोशल मीडियाच्या फेसबुकवरून पोस्ट करून पोलिसांच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या पोस्टनंतर माहूरसह संपूर्ण जिल्ह्यात हा विषय चर्चेचा बनला आहे.पोलीस वाहनांमध्ये टाकून त्रिशूल पाटील यांना भोकर येथे अप्पर पोलीस अधीक्षकांसमक्ष हजर करण्यासाठी घेऊन गेले असल्याचे आरोपात नमूद आहे. जर ताब्यात घेतलेच नाही तर मग पोलीस वाहनातून भोकरला का नेले? असा थेट सवाल जरांगे पाटील समर्थक व मराठा समाज बांधव विचारत आहेत.

त्रिशूल पाटील यांना अटक करून नेण्यामागचे नेमके कारण काय? त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल आहे? त्यांना कोणत्या चौकशीसाठी नेण्यात आले? याबाबत सिंदखेड पोलिसांकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. त्यामुळे ही कारवाई संशयास्पद असल्याची भावना समाजात निर्माण झाली आहे.पोलिसांची ही कारवाई संशयास्पद व मराठा सेवकांना त्रास देणारी हुकूमशाही पद्धतीची आहे, अशी जोरदार टीका सोशल मीडियाच्या माध्यमातून जरांगे पाटील समर्थक व मराठा समाज बांधवांकडून करण्यात येत असून या घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments