नांदेड| येत्या 12/12/2024 रोज गुरूवारी ज्येष्ठ नागरिक महासंघ(फेस्काॅम) मुंबईचा स्थापना दिन अर्थात वाढ दिवस आहे. फेस्काॅमचे नूतन अध्यक्ष मा. अन्नासाहेब टेकाळे यांच्या संकल्पने प्रमाणे खास ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकाभिमुख असे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम ,चर्चा सत्रे,मेळावे तथा लोकोपयोगी आरोग्य शिबिरे घेण्यात यावेत असे आहे.
त्यां अनुशंघाने येत्या बारा डिसेंबर रोजी वैद्य रूग्णालयात लाॅयन्स क्लब ,मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्काॅम,वैद्य बाल रूग्णालय,सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ,वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघ,नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती ताथा वनिता विकास मंडळ महिला ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र रोग तपासनी आणि मोतीबिंदू शस्र क्रिया शिबीर घेण्यात येत आहे.
.
शिबिरा साठी 9423138385 /78878 33198 या भ्रमण ध्वनीवर पूर्व नोंदणी आवश्यक आहे.विना मुल्य शस्रक्रिये साठी पिवळे रेशन कार्ड किंवा दारिद्र्य रेषे खालील कार्ड,ओळख पत्रा साठी आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा ज्येष्ठ नागरिक कार्ड आणि बी.पी., शूगर, हृदय रोग,फप्फूसाचा आजार नसल्याचे डाॅक्टरांचे प्रमाण पत्र आवश्यक आहे.शस्रक्रिया,औषधी आणि रूग्णालयाच्या बिलापोटी हजारो रूपये खर्चा ऐवजी शस्रक्रिये नंतर चष्मा, औषधासाठी म्हणून फक्त आणि फक्त 250 -350 रू खर्च येईल!तपासणी फिस,नंबर देणें तथा आॅपरेशन फिस शून्य तथा विना मुल्य असेल.
दिनांक:–12/12/2024.स्थळः-वैद्य रूग्णालय एस.पी.आॅफिस समोर वजिराबाद नांदेड, वेळः-सकाळी 9.30 ते 12.30तेव्हा ज्येष्ठ नागरिकांनीं या शिबीराचा फायदा घ्यावा असे आवाहान डाॅ.हंसराज वैद्य, प्रभाकर कुंटूरकर,गिरिष बार्हाळे, तथा सहयोगी संस्था पदाधिकार्यांनी केले आहे.