नांदेड| सुप्रसिद्ध कलावंत, साहित्यिक सुधाकर कदम यांची वसमत तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
पारंपारिक लोक कलावंतांच्या न्याय हक्काकरिता सदैव प्रयत्नशील असणाऱ्या पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे कामारीकर यांनी संघटन वाढीसाठी कदम यांची निवड करून त्यांना सुप्रसिद्ध सिने अभिनेते डॉ.प्रमोद अंबाळकर यांच्या हस्ते दि.८ डिसेंबर २०२४ रविवार रोजी नियुक्तीपत्र दिले आहे. यावेळी मंडळाचे मराठवाडा अध्यक्ष शाहीर बापूराव जमदाडे, प्रसिद्धीप्रमुख सुशीलकुमार भवरे यांची उपस्थिती होती.
सुधाकर कदम हे लोक कलावंत असून ते ‘ ‘मी संत गाडगेबाबा बोलतोय’ हे एकपात्री नाटक तसेच’ हास्यखजिना ‘, ‘मी शेतकरी बोलतोय’ या एकपात्री नाट्याचे शाळा,महाविद्यालय, खेडेगाव, वसतिगृह, गणेशोत्सव,नवरात्रोत्सव, महिला बचतगटांमध्ये एकपात्री नाट्य प्रयोग सादर करतात. त्यांच्या नाट्य क्षेत्रातील तसेच साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक मान्यवरांनी सत्कार केले आहेत.त्यांना आतापर्यंत अनेक नामांकित संस्थांचे विविध पुरस्कारही मिळाले आहेत. या निवडीबद्दल शाहीर दिगू तुमवाड, डॉ. सुनील जाधव, डॉ.निर्मला पदमावत यांच्यासह अनेक मान्यवरांनी कदम यांचे अभिनंदन केले आहे.