Homeनांदेडहिमायतनगरच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत कायमस्वरूपी विद्युत रोषणाई; विनोद गुंडेवार, राजू जैस्वाल यांचा पुढाकार!

हिमायतनगरच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत कायमस्वरूपी विद्युत रोषणाई; विनोद गुंडेवार, राजू जैस्वाल यांचा पुढाकार!

स्वखर्चातून फोकस लाईटची व्यवस्था; रात्रीच्या अंत्यसंस्कारातील अडचणी दूर करण्यासाठी युवकांचे सामाजिक योगदान

हिमायतनगर (वाढोणा), अनिल मादसवार| हिमायतनगर शहरातील बोरगडी रोडवरील वैकुंठधाम हिंदू स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करताना अंधारामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन नगरपंचायतीचे युवा उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार आणि प्रसिद्ध व्यापारी राजू जैस्वाल यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून कायमस्वरूपी विद्युत रोषणाईची व्यवस्था केली आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे स्मशानभूमीत रात्रीच्या अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हिंदू स्मशानभूमी परिसरात पुरेशा प्रकाशाची व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात आल्यानंतर विनोद गुंडेवार, राजू जैस्वाल यांच्यासह शहरातील अनेक युवकांनी पुढाकार घेत स्मशानभूमीची स्वच्छता केली. केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित न राहता या परिसराचा कायापालट करण्याच्या उद्देशाने त्यांनी स्वखर्चातून मोठ्या क्षमतेचे फोकस लाईट बसवून कायमस्वरूपी विद्युत रोषणाईची व्यवस्था केली.

अंधार दूर करण्यासोबतच सुशोभीकरणाचाही संकल्प! स्मशानभूमी ही समाजाच्या जीवनातील अंतिम संस्कारांशी निगडित अत्यंत महत्त्वाची जागा आहे. अशा ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. याच भावनेतून पुढाकार घेतलेल्या या युवकांनी आगामी काळात स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करून परिसर हिरवागार आणि स्वच्छ बनविण्याचा संकल्प केला आहे. वृक्षवल्ली लावून सुशोभीकरणाच्या माध्यमातून वैकुंठधाम परिसर अधिक सुंदर करण्याचा त्यांचा मानस आहे.

IMG 20261019 191606 हिमायतनगरच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत कायमस्वरूपी विद्युत रोषणाई; विनोद गुंडेवार, राजू जैस्वाल यांचा पुढाकार!
Oplus_16908288

सामाजिक बांधिलकीचा आदर्श – स्वखर्चातून केलेल्या विद्युत रोषणाईमुळे रात्रीच्या अंत्यसंस्कारावेळी अंधारात होणारी गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे. सार्वजनिक सुविधांसाठी केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता नागरिकांनीही पुढाकार घेतल्यास अनेक समस्या मार्गी लागू शकतात, याचे उदाहरण या उपक्रमातून समोर आले आहे.

IMG 20261019 190335 हिमायतनगरच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत कायमस्वरूपी विद्युत रोषणाई; विनोद गुंडेवार, राजू जैस्वाल यांचा पुढाकार!
Oplus_16908288

विनोद गुंडेवार, राजू जैस्वाल यांचा पुढाकार आणि वामनराव पाटील वडगावकर, ज्ञानेश्वर पालीकुंडलवार, योगेश गुंडेवार, सोनू मादसवार, प्रकाश रामादिनवार, साई गुंडेवार, व्यंकटेश पालीकुंडलवार, पवन गुंडेवार, रितिक जिट्टेवाड, अमोल धुमाळे यांच्यासह सर्व श्रमदानं करणाऱ्या युवकांचे हिमायतनगर शहरवासीयांकडून कौतुक होत असून, वैकुंठधामच्या स्वच्छता, प्रकाशव्यवस्था आणि सुशोभीकरणासाठी उचललेले हे पाऊल सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवणारे ठरत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments