Wednesday, May 20

तेलंगणा

A creative collection of intelligent, highly defined and functional skincare. Products are rich in natural actives …

Lendi flood area ; लेंडी बुडीत क्षेत्रातील दुर्घटनेवर शिवसेनेचा संताप – तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याकडे आर्थिक मदतीची मागणी

Lendi flood area ; लेंडी बुडीत क्षेत्रातील दुर्घटनेवर शिवसेनेचा संताप – तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याकडे आर्थिक मदतीची मागणी

तेलंगणा, नांदेड, महाराष्ट्र
मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील दुर्घटनेत गावकऱ्यांचे मोठे हाल झाले असताना शासन प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे १२ जणांचा बळी गेला. शेकडो जनावरे दगावली, शेतपिके व घरे वाहून गेली, शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. तरीसुद्धा महाराष्ट्र शासन व स्थानिक आमदार गप्प बसले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने थेट तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याकडे धाव घेत तातडीच्या आर्थिक मदतीची मागणी केली आहे. हैदराबाद येथे नांदेडचे खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी शिवसेनेचे पाटील यांनी सांगितले की, लेंडी प्रकल्पातील ६० टक्के पाणी तेलंगणाचा वाटा असल्याने या आपत्तीत बाधित कुटुंबांना, शेतकऱ्यांना, मजुरांना व गोरगरीबांना तेलंगणा सरकारकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर व्हावी. प्रशासनाने ...
DRM Pradeep Kamle : डीआरएम प्रदीप कामले यांची हिमायतनगर व आदिलाबाद रेल्वे स्थानकांना धावती भेट – अमृत भारत स्टेशन कामांची पाहणी

DRM Pradeep Kamle : डीआरएम प्रदीप कामले यांची हिमायतनगर व आदिलाबाद रेल्वे स्थानकांना धावती भेट – अमृत भारत स्टेशन कामांची पाहणी

नांदेड, तेलंगणा
नांदेड, अनिल मादसवार| नांदेड विभागातील दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) श्री प्रदीप कामले यांनी आज हिमायतनगर आदिलाबाद येथील रेल्वे स्थानकाला धावती भेट दिली. नांदेड-आदिलाबाद-पिंपळकुट्टी विभागाची विस्तृत तपासणी केली आणि प्रमुख विकासात्मक आणि सुरक्षित कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. तपासणी दरम्यान, श्री कामले यांनी हिमायतनगर स्थानकाला भेट दिली, जिथे त्यांनी जागतिक दर्जाच्या सुविधा प्रदान करण्याच्या आणि प्रवाशांना सुधारित अनुभव देण्याच्या उद्देशाने अमृत भारत स्टेशन (एबीएस) योजनेअंतर्गत कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. आदिलाबाद स्थानकावर आगमन झाल्यावर, श्री कामले यांनी अमृत भारत स्टेशनच्या कामाची प्रगती, प्रवाशांची सोय आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी पिट लाईन सुविधा आणि लिफ्ट बसवण्याच्या कामांची पाहणी केली. पुढे, डीआरएम साहेबांनी सुरक्षा पायाभूत सुविधा मजबूत करण्या...
Canceled : विजयवाडा विभागातील लाईन ब्लॉकमुळे पुढील गाड्या काही दिवसांसाठी रद्द

Canceled : विजयवाडा विभागातील लाईन ब्लॉकमुळे पुढील गाड्या काही दिवसांसाठी रद्द

नांदेड, तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड| विजयवाडा विभागातील लाईन ब्लॉकमुळे पुढील गाड्या काही दिवसांसाठी रद्द करण्यात येत आहेत. यात आदिलाबाद – तिरुपती – आदिलाबाद एक्स्प्रेस आणि जालना – तिरुपती – जालना विशेष एक्स्प्रेस गाडीचा समावेष आहे. विजयवाडा विभागातील गुडूर ते विजयवाडा सेक्शन मधील पेद्दावादैपुडी – दुग्गीराला – तेनाली – सुन्दुरू स्थानकांदरम्यान तिसरी रेल्वे लाईन सुरु करण्याकरिता लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे, या लाईन ब्लॉकमुळे काही रेल्वे गाड्यांच्या परिचालनावार परिणाम झाला आहे. तो पुढील प्रमाणे :- रद्द करण्यात आलेल्या गाड्या : 1. गाडी क्रमांक 17405 तिरुपती ते आदिलाबाद कृष्णा एक्स्प्रेस दिनांक 13 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट, 2025 दरम्यान रद्द करण्यात आली आहे. 2. गाडी क्रमांक 17406 आदिलाबाद ते तिरुपती कृष्णा एक्स्प्रेस दिनांक 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट, 2025 दरम्यान रद्द करण्यात आली आहे. 3. गाडी क्रमांक 07609 जालना ते तिरुपती...
Bidar’s gurudwara : बिदरच्या गुरुद्वाराला बॉम्बने उडवण्याची धमकी

Bidar’s gurudwara : बिदरच्या गुरुद्वाराला बॉम्बने उडवण्याची धमकी

क्राईम, तेलंगणा, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या बिदर शहरातील धार्मिकस्थान श्री नानकझीरा साहेब गुरुद्वाराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे मिळाली आहे. त्यामुळे कर्नाटक, महाराष्ट्र आणी तेलंगानातील शीख समाज अस्वस्थ झाला आहे. कर्नाटक येथील बिदर शहरात शीख धर्माचे पाहिले गुरु श्री गुरु नानक देवजी यांचा गुरुद्वारा विद्यमान आहे. गुरुद्वारा नानक झीरा साहेब म्हणून गुरुद्वाराची जगभर ओळख आहे. तसेच रोज हजारोंच्या संख्येत भाविक गण येथे दर्शनासाठी भेट देतात. नांदेड मधूनही असंख्य भाविक बीदरला जात असतात. शुक्रवार, दि. १८ जुले रोजी सकाळी बिदर गुरुद्वाराच्या संकेतस्थळावर एका अज्ञात व्यक्तिनी ईमेल पाठवून गुरुद्वाराची इमारत बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी दिली आहे. गुरुद्वाराचे अधीक्षक स. जगजीतसिंघ सिलेदार यांनी वरील बाब गुरुद्वारा अध्यक्ष स. बलबीरसिंघ व पोलीस प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिली. पोलीस...
08 special trains Round : काचीगुडा – नगरसोल – काचीगुडा दरम्यान विशेष गाडीच्या 08 फेऱ्या चालवणा

08 special trains Round : काचीगुडा – नगरसोल – काचीगुडा दरम्यान विशेष गाडीच्या 08 फेऱ्या चालवणा

नांदेड, तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड| प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, दक्षिण मध्य रेल्वेने काचीगुडा – नगरसोल – काचीगुडा दरम्यान खालील प्रमाणे विशेष गाडीच्या आठ फेऱ्या चालवणार असल्याची माहिती दिली आहे. गाडी क्रमांक 07055 काचीगुडा - नगरसोल स्पेशल दिनांक 07.08.25, 14.08.25, 21.08.25, 28.08.25 रोजी काचीगुडा येथून दर गुरुवारी दुपारी 15.45 सुटेल आणि सिकंदराबाद, बेगमपेट, लिंगमपली, शंकरपल्ली, विकाराबाद, झहीराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, जालना, औरंगाबाद, रोटेगाव मार्गे नगरसोल येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 07.45 (शुक्र) पोहोचेल. गाडी क्रमांक 07056 नगरसोल - काचीगुडा स्पेशल गाडी दिनांक 08.08.25, 15.08.25, 22.08.25, 29.08.25 रोजी नगरसोल येथून शुक्रवारी 17.30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच काचीगुडा येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल. या विशेष गाड्यांमध्ये 1AC, 2AC, 3AC, स्लीप...
Nanded and Tirupati : हुजूर साहिब नांदेड ते तिरुपती दरम्यान विशेष गाडीच्या 16 फेऱ्या

Nanded and Tirupati : हुजूर साहिब नांदेड ते तिरुपती दरम्यान विशेष गाडीच्या 16 फेऱ्या

नांदेड, तेलंगणा, धार्मिक
16 special train trips between Huzur Sahib Nanded and Tirupati नांदेड| अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, दक्षिण मध्य रेल्वे नांदेड ते तिरुपती दरम्यान खालीलप्रमाणे विशेष गाड्या चालवणार आहे. अशी माहिती दक्षिण रेल्वे विभागाने प्रसिद्धीस दिली आहे. अनु क्र गाडी क्र. कुठून – कुठे प्रस्थान आगमन दिनांक 1 07189 नांदेड - तिरुपती 16.30(शुक्र) 12.30 (शनि) 04.07.25 ते 25.07.25 2 07190 तिरुपती – नांदेड 14.20 (शनि) 09.30 (रवि) 05.07.25 ते 26.07.25 3 07015 नांदेड - तिरुपती 16.50 (शनि) 10.10 (रवि) 05.07.25 ते 26.07.25 4 07016 तिरुपती – नांदेड 16.40 (रवि) 13.15 (सोम) 06.07.25 ते 27.07.25 गाडी क्रमांक 07189/07190 नांदेड - तिरुपती - नांदेड स्पेशल (08 फेऱ्या ): या विशेष गाड्या मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, कामारेड्डी, मेडचल, चेरलापल्ली, नलगोंडा, मिर्यालागुडा, नाडीकुडे, पिदुगुरल्ला, नेमलीपुरी, रोमप...
Pandharpur News : पंढरपूरसाठी आदिलाबाद, नगरसोलवरून विशेष रेल्वे; आषाढीसाठी ५ ते ७ जुलैदरम्यान गाडी धावणार

Pandharpur News : पंढरपूरसाठी आदिलाबाद, नगरसोलवरून विशेष रेल्वे; आषाढीसाठी ५ ते ७ जुलैदरम्यान गाडी धावणार

नांदेड, तेलंगणा, धार्मिक
Pandharpur Special Train नांदेड| वर्षातून एकदा येणाऱ्या पंढरपूर येथील आषाढी एकादशी उत्सव निमित्त दक्षिण मध्य रेल्वेने पंढरपूरसाठी विशेष रेल्वे ५ ते ७ जुलै रोजी चलवण्याचे ठरवले आहे. यात अकोला, आदिलाबाद, नगरसोलवरून विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले असल्याचे रेल्वे विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. नगरसोल - मिरज (१०७५१५) ही रेल्वे शनिवारी (५ जुलै) रात्री सात सात वाजेच्या सुमारास निघून दुसऱ्या दिवशी रविवारी (६ जुलै) दुपारी ३.५५ वाजता पोहोचेल, तर मिरज- नगरसोल ( २०७५१६) ही रेल्वे मिरज वरून रविवारी (दि. ६) सायंकाळी ५.२५ निघून दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.७) सकाळी ११ वाजता नगरसोलला पोहोचेल. प्रवासात दोन्ही दिशेला रोटेगाव, लासूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी, पंढरपूर या रेल्वेस्थानकांव...
Sahasrakund waterfall : निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा सहस्त्रकुंड धबधबा ओसडून वाहू लागला

Sahasrakund waterfall : निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा सहस्त्रकुंड धबधबा ओसडून वाहू लागला

नांदेड, तेलंगणा, महाराष्ट्र, व्हिडीओ
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट तालुक्यातील निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा सहस्रकुंड धबधबा हा गेल्या चार महिन्यापासून पैनगंगा नदी पात्राला पाणी नसल्यामुळे खंडित झाला होता. गेल्या दोन दिवसापासून चालू असलेल्या सततधार पावसामुळे सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहताना पहावयास मिळत आहे. त्यामुळे पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. विदर्भ मराठवाडा सीमेवर वसलेला नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा हा पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे. गेल्या दोन दिवसापासून चालू असलेल्या सतत धार पावसामुळे निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा सहस्त्रकुंड धबधबा हा ओसंडून वाहू लागला आहे. धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी मराठवाड्यातूनच नव्हे तर तर मुंबई, पुणे, हैदराबाद, म्हैस, निझामाबाद, दिलाबाद यासारख्या ठिकाणाहून या पर्यटन स्थळाला पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. पाण्याअभावी धबधबा खंडित झाल्याने पर्यटकांचा हिरमोड झ...
Basar Breking News ; बासर येथील गोदावरी नदीत बुडून हैदराबादच्या पाच युवकांचा मृत्यू

Basar Breking News ; बासर येथील गोदावरी नदीत बुडून हैदराबादच्या पाच युवकांचा मृत्यू

नांदेड, तेलंगणा, लाइफस्टाइल
धर्माबाद/बासर। धर्माबाद येथून जवळच असलेल्या तीर्थक्षेत्र बासर येथील गोदावरी नदीत पवित्र स्नान करण्यासाठी हैदराबाद येथून आलेल्या 18 भाविकांपैकी 5 युवकांचा गोदावरी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हैदराबाद मधील चिंतल बाजार येथे राहणाऱ्या कुटुंबातील 18 जन बासर येथे दर्शनासाठी आले होते. दर्शनपूर्वी गोदावरी नदीत पवित्र स्नान करण्यासाठी गेले असता त्यातील 5 युवकांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि पाण्यात साचून असलेली वाळूची गाळ खचून गेल्याने ते नदीच्या पात्रात बुडाले हा प्रकार त्यांच्या सोबतच्या इतर नातेवाईक आणि नदी काठी असलेल्या लोकांच्या निदर्शनास आला. तत्काळ हा प्रकार येथील प्रशासनास कळविण्यात आला. उपस्थित नागरिक, प्रशासनाचे पथक यांच्या जीव रक्षक दलाचे जवान यांच्या मदतीने नदीत शोध घेऊन या पाच युवकांचे मृतदेह नदीतून बाहेर काढून शव विच्छेदन आणि उत्तरीय तपासणी साठी म्हैसा येथील रुग्णाल...
Santshree Bhatji Bapu Maharaj : हैदराबादचे संतश्री भटजी बापू महाराज मठाचे व्यवस्थापक भगवान महाराज जोशी यांचे दुःखद निधन

Santshree Bhatji Bapu Maharaj : हैदराबादचे संतश्री भटजी बापू महाराज मठाचे व्यवस्थापक भगवान महाराज जोशी यांचे दुःखद निधन

नांदेड, तेलंगणा, लाइफस्टाइल
नांदेड| हैदराबाद येथील संतश्री भटजी बापू महाराज मठाचे व्यवस्थापक भगवान महाराज जोशी (६८) यांचे प्रदीर्घ आजारानंतर आज दुपारी निधन झाले. हैदराबाद येथील संतश्री भटजी बापू महाराज संस्थानचे गेल्या अनेक वर्षापासून व्यवस्थापन करणारे भगवान महाराज जोशी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. संस्थानच्या विश्वस्तांसोबत समन्वयाची भूमिका घेत त्यांनी या संस्थानला नावारुपास आणले होते. नुकत्याच झालेल्या संस्थानच्या संतश्री भटजी बापू महाराज यांच्या ९३ व्या प पुण्यतिथी महोत्सवात आजारी असतानाही २२ मे ते २४ मे या दरम्यान ते सहभागी झाले होते. त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि आज दुपारी त्यांचे दुःखद निधन झाले. आज सायंकाळी त्यांच्यावर हैदराबाद येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संस्थानचे विश्वस्त तसेच मोठ्या प्रमाणात भक्तगण व नातेवाईक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, नातवंडे...
error: Content is protected !!