Thursday, May 14

तेलंगणा

A creative collection of intelligent, highly defined and functional skincare. Products are rich in natural actives …

Abhishek Bakewad ; अभिषेक बकेवाड यांची तेलंगणा राज्यातील समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तीची हेद्राबाद येथे भेट…

Abhishek Bakewad ; अभिषेक बकेवाड यांची तेलंगणा राज्यातील समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तीची हेद्राबाद येथे भेट…

नांदेड, तेलंगणा
नांदेड l दि.2 डिसेंबर 2024 रोजी गोल्ला -गोल्लेवार यादव समाज संघटनेचे नांदेड जिल्हा युवा अध्यक्ष तथा राष्ट्रीय यादव महासभा दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष युवक श्री.अभिषेक जंगन्ना बकेवाड यांनी समाजाप्रती असलेले प्रेम समाज एकजुट करण्यासाठीची तळमळ हि मागील कित्येक वर्षापासुन सोशलमिडिया मार्फत दाखवत होते.पण ते तेवढ्यावरच न थांबता त्यांनी आता समाज एकजुट करण्यासाठी एक वसाच घेतला असं म्हणायला वावगं ठरणार नाही. महाराष्ट्रातील समाज एकजुक करण्याबरोबरच आता थेट मैदानात उतरुन थेट तेलंगाना राज्यातील गोल्ला-गोलेवार यादव समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तिच्या भेटी गाठी करत आहेत. त्यातच त्यांनी काल हैद्राबाद येथील हैद्राबाद चे माजी महापौर सौ.श्रीदेवी यादव, श्री.आर.लक्ष्मण यादव आमदार हैदराबाद, बिल्डर हैद्राबाद नामांकित उद्योजक बंबलू यादव, यादव संगम प्रदेश अध्यक्ष रामलु मैकालू यादव, प्रदेश युवक यशवंतराव गोर्...
Jode Maro Andolan : समस्त हिंदूंच्या भावनेशी खेळणाऱ्या जगन मोहन रेड्डी प्रतिमेस जोडे मारो आंदोलन -NNL

Jode Maro Andolan : समस्त हिंदूंच्या भावनेशी खेळणाऱ्या जगन मोहन रेड्डी प्रतिमेस जोडे मारो आंदोलन -NNL

नांदेड, तेलंगणा, महाराष्ट्र
नवीन नांदेड| आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात आंध्र प्रदेश मधील तिरूमला तिरुपती देवस्थान येथे भक्तांना वाटणाऱ्या लाडू प्रसाद मध्ये शुद्धतुप ऐवजी माशापासून व वेस्टेज मटन पासून निघणाऱ्या ऑइल आणि डुकराची चरबी लाडू प्रसादामध्ये वापरण्यात आल्याच्या निषधार्थ जगन मोहन रेड्डी प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात आंध्र प्रदेश मधील तिरूमला तिरुपती देवस्थान येथे अतिशय संताप जनक प्रकार समोर आला आहे. भक्तांना वाटणाऱ्या लाडू प्रसाद मध्ये शुद्धतुप ऐवजी माशापासून व वेस्टेज मटन पासून निघणाऱ्या ऑइल आणि डुकराची चरबी गाई म्हशीचे गिफ्ट या लाडू प्रसादामध्ये वापरण्यात आले. हे केंद्रीय अन्न औषध प्रशासनाने काल उघडीस आणले लाखो हिंदूंच्या भावना आणि श्रद्धा खेळणाऱ्या आणि समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखवणाऱ...
Purna karimnagar trean ; औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, भोकर, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद मार्गे पुणे – करीमनगर – पुणे विशेष गाडीच्या 08 फेऱ्या मंजूर -NNL

Purna karimnagar trean ; औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, भोकर, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद मार्गे पुणे – करीमनगर – पुणे विशेष गाडीच्या 08 फेऱ्या मंजूर -NNL

तेलंगणा, नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, भोकर, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद मार्गे पुणे – करीमनगर – पुणे विशेष गाडीच्या 08 फेऱ्या मंजूर करण्यात आल्या आहेत. दसरा आणि दिवाळी निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने पुणे – करीमनगर – पुणे विशेष गाडीच्या 08 फेऱ्या मंजूर केल्या आहेत. पुणे – करीमनगर साप्ताहिक विशेष गाडीच्या 04 फेऱ्या : गाडी क्रमांक 01451 पुणे–करीमनगर विशेष गाडी दिनांक 21 आणि 28 ऑक्टोबर रोजी व 04 आणि 11 नोव्हेंबर, 2024 रोजी दर सोमवारी पुणे रेल्वे स्थानकावरून रात्री 22.45 वाजता सुटेल आणि दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, अंकाई, रोटेगाव, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हुजूर साहिब नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायत नगर, सहस्तरकुंड, बोधडी, किनवट, आदिलाबाद, माजरी, चंद्रपूर, बलारशा, सिरपुरकागजनगर, मंचिर्याल, रामागुंडम, पेडपल्ली मार्गे करीमनगर येथे बुधवारी स...
MP Vasantrao Chavan’s health deteriorated : नांदेडचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांची प्रकृती खालावली; प्रकृती स्थिर -NNL

MP Vasantrao Chavan’s health deteriorated : नांदेडचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांची प्रकृती खालावली; प्रकृती स्थिर -NNL

नांदेड, तेलंगणा, राजकीय
नांदेड,अनिल मादसवार| नांदेड येथील काँग्रेसच्या मेळाव्यामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले असल्याने नांदेड लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने एअर अम्ब्युलन्सने हैद्राबादला हलविले आहे. दर महिन्याला त्यांना डायलिसीस कराव लागत. पण त्यांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्याने अचानक प्रकृती खालावली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. १५ ऑगस्ट दिवशी त्यांच्या वाढदिवस सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सोहळा, महाप्रसाद, वाढदिवस कार्यक्रम व इतर सर्व सामाजिक कार्यक्रम रद्द करण्यात आले अशी माहिती चव्हाण परिवाराच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवीण्यात आली आहे. यकृतामध्ये इन्फेक्शन झाल्याने त्यांना नांदेडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कमी रक्तदाब व श्वास घेण्यास अड...
Marathwada Telangana border ; मराठवाडा तेलंगाणा सिमारेषा असलेल्या वाशीजवळ दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद – NNL

Marathwada Telangana border ; मराठवाडा तेलंगाणा सिमारेषा असलेल्या वाशीजवळ दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद – NNL

Blog, तेलंगणा, नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार | मराठवाडा ते तेलंगणा जाण्यासाठी सोयीचा आणी जवळचा ठरणारा वाशी गावा शेजारील डोंगरात दरड कोसळल्याने हा मार्ग रहदारी साठी मोठे वाहनांना बंद झाला असून, दुचाकी वाहणे कशी तरी मार्ग काढीत येजा करीत आहेत. मात्र चारचाकी वाहणाला हा रस्ता सध्याला बंदच आहे. या ठिकाणी दरड कोसळलेल्या मलमा व दगड हटवून हा रस्ता रहदारीसाठी मोकळा करावा. अशी मागणी तेलंगणा महाराष्ट्रातील प्रवाशी नागरिक व वाहनदरकातून होत आहे. मराठवाडा ते तेलंगणा राज्य रस्ता वाशी मार्गे कुबेर भैंसा, बासर, निर्मळ, निझामाबाद, पुढे हैद्राबाद जाण्यासाठी हा रस्ता प्रवाश्यांसाठी सोयीचा आणी जवळचा मानला जातो. तत्कालीन माजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील यांच्या प्रयत्नातून ह्या अंतर्गत रस्त्याचे काम २५ वर्षांपूर्वी घाटाच्या अलीकडून पुर्ण झाले होते. तेव्हापासून या अंतर्गत रस्त्यावर कुण्याही राजकीय प...
A stream of tourists; Spectacular Gowalkonda | पर्यटकांचा ओढा; हैद्राबादचा प्रेक्षणीय गोवळकोंडा… NNL

A stream of tourists; Spectacular Gowalkonda | पर्यटकांचा ओढा; हैद्राबादचा प्रेक्षणीय गोवळकोंडा… NNL

नांदेड, तेलंगणा, लेख
आंधप्रदेशातील तथा विद्यमान तेलंगना राज्यात येणारा गोवळकोंडा किल्ला हैद्राबादच्या पूर्वेला दिमाखदारपणे अजूनही उभा आहे. हैद्राबाद शहरात सालारजंग म्युझियम, नेहरु तारांगण, चारमिनार, रामोजी फिल्मसिटी, हुसेन सागर, डॉ. आंबेडकर स्टॅच्यू हे पर्यटकांची खास आवडीची क्षेत्रे आहेत. हैद्राबाद शहर ऐतिहासिक शहर आहे. स्वातंत्र्यापूर्वी येथे निझामाचे संस्थान होते. निजामाने काही अनोख्या बाबी उपलब्ध करुन दिलेल्या आजही जशाच्या तशार आहेत. निजामापूर्वी कुतुबशाहीचे वर्चस्व तेलंगणाच्या भूमीवर अस्तित्वात होते. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही यांच्यात नेहमी शीतयुद्ध अधुन- मधून होत असत. त्यामुळे हैद्राबादच्या जडणघडणीत राजे- महाराजे यांच्याबरोबर कुतुबशहांचेही बस्तान चांगल्याच प्रकारचे होते. म्हणून हैद्राबादचा परिसर अनेक ऐतिहासिक बाबींसाठी प्रसिद्ध आहे. कोंण्डा म्हणजे डोंगराभोवती गोल पसरलेला किल्ला...! सदर किल्ला ह...
Visit of Central Project Manager | रेल्वेच्या सेंट्रल प्रोजेक्ट मॅनेजर यांची हिमायतनगर रेल्वेस्थानकावर भेट; विकास कामाची पाहणी -NNL

Visit of Central Project Manager | रेल्वेच्या सेंट्रल प्रोजेक्ट मॅनेजर यांची हिमायतनगर रेल्वेस्थानकावर भेट; विकास कामाची पाहणी -NNL

नांदेड, तेलंगणा, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार। मुदखेड आदीलाबाद ब्रॉडगेज रेल्वे लाईनवर असलेल्या हिमायतनगर रेल्वे स्थानकाला दि 25 रोजी (सिपीएम ) सेंट्रल प्रोजेक्ट मॅनेजर यांनी भेट देऊन स्थानकावरील चालू असलेल्या विकास कामाची पाहणी केली. रेल्वेस्थानकावर स्वागत कक्ष स्थापन करून तेथे स्वागत कमान उभारण्यात येणार असून, त्याच बरोबर डिवायडर बसवून अंतर्गत रस्त्याचा विकास करण्यात येणार असल्याने हिमायतनगर रेल्वे स्थानक आता हायटेक स्थानक होणार आहे. आखण्यात आलेल्या अंदाज पत्रकानुसार कामांना गती देऊन हिमायतनगर रेल्वे स्थानकाच्या नाविनिकरणाचे काम जलद गतीने पूर्ण करावे अश्या सूचना संबंधितांना दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत रेल्वेचे अधिकारी, अभियंता व इतर कर्मचारी उपस्थित होते. हिमायतनगर हे शहर तेलंगणा आणि विदर्भाच्या सीमेवर वसलेले असल्याने येथे दोन्ही प्रांतातील लोक खरेदीसाठी येतात, हिमायतनगर रेल्वे स्थानकावरून व्यापारी खरेदीसाठ...
error: Content is protected !!