HomeनांदेडMP Vasantrao Chavan's health deteriorated : नांदेडचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांची...

MP Vasantrao Chavan’s health deteriorated : नांदेडचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांची प्रकृती खालावली; प्रकृती स्थिर -NNL

नांदेड,अनिल मादसवार| नांदेड येथील काँग्रेसच्या मेळाव्यामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले असल्याने नांदेड लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने एअर अम्ब्युलन्सने हैद्राबादला हलविले आहे. दर महिन्याला त्यांना डायलिसीस कराव लागत. पण त्यांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्याने अचानक प्रकृती खालावली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. १५ ऑगस्ट दिवशी त्यांच्या वाढदिवस सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सोहळा, महाप्रसाद, वाढदिवस कार्यक्रम व इतर सर्व सामाजिक कार्यक्रम रद्द करण्यात आले अशी माहिती चव्हाण परिवाराच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवीण्यात आली आहे.

यकृतामध्ये इन्फेक्शन झाल्याने त्यांना नांदेडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कमी रक्तदाब व श्वास घेण्यास अडचण यामुळे प्रकृती खालावली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. तरीही धोका न पत्करता पुढील उपचारासाठी एअर अम्ब्युलन्सने मंगळवारी साडे पाच वाजता हैद्राबादला हलविण्यात आले आहे.
     
काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे दर महिन्याच्या १० तारखेला ते डायलसिस करतात. पण नांदेडमध्ये आयोजित काँग्रेसच्या विभागीय बैठकीमुळे त्यांना नियमित आरोग्य चाचण्या करणे जमले नाही. थोडे प्रकृतीकडेही दुर्लक्ष झाले असल्याने त्यांची तब्येत अचानक बिघडली.  मंगळवारी सकाळच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तातडीने नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती ठीक झाली. मात्र कोणताही धोका न पत्करता त्यांना तातडीने एअर अम्ब्युलन्सने हैदराबादला नेण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक नांदेडमध्ये आयोजित करण्यात आली होती. तसेच मराठवाड्यात विविध ठिकाणी असलेल्या कार्यक्रमाना भेटी-गाठी व उपस्थिती लावणे. या बैठकीमुळे खासदार वसंतरावांची धावपळ आणि दगदग झाली. यामुळे इन्फेक्शनही झाले. म्हणून मंगळवारी सकाळी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या प्रकृती चांगली असली तरी धोका नको म्ह्णून सायंकाळी पाच वाजता त्यांना एअर अम्ब्युलन्सने हैद्राबाद येथे हलविण्यात आले असून, एका खासगी रुग्णालयात आरोग्य तपासणी व उपचार करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार वसंतराव चव्हाण यांची आज अचानक तब्येत बिघडली उदयाला १५ ऑगस्ट दिवशी त्यांच्या वाढदिवस सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सोहळा, महाप्रसाद, वाढदिवस व इतर सर्व सामाजिक उपक्रम रद्द करण्यात आले आहेत. नांदेड लोकसभा मतदार संघातील काँग्रेस, महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्ते, आप्तस्वकीय, मित्र मंडळींनी त्या दिवशी हार- तुरे पुष्पगुच्छ घेऊन येऊ नये. कारण वसंतराव चव्हाण हे त्यादिवशी भेटीसाठी उपलब्ध राहणार नाहीत. अशी माहिती चव्हाण परिवाराच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments