Homeनांदेडजलाशयात पाणीसाठा असताना शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करू नका- माजी आ. धोंडगे

जलाशयात पाणीसाठा असताना शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करू नका- माजी आ. धोंडगे

कंधार,सचिन मोरे| एकीकडे अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील पिके संकटात सापडली असताना दुसरीकडे जलाशय परिसरातील शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिरिक्त जलसाठा उपलब्ध असलेल्या जलाशयांवरील शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी तहसीलदार, कंधार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रशासनाने या प्रश्नावर योग्य निर्णय न घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

कंधार येथे शिवसेना संपर्क कार्यालयात शुक्रवारी ९ ऑक्टोबर रोजी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की चालू खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून सिंचनाची व्यवस्था केली आहे. मात्र, जलाशय परिसरातील शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित केल्यास पिकांना पाणी देणे कठीण होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणखी वाढू शकते, अशी चिंता पत्रकारांशी हितगुज करतांना धोंडगे यांनी व्यक्त केली.

जलाशयातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या मुद्द्यावर प्रशासनाने योग्य नियोजन करावे. उपलब्ध जलसाठ्याचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून पिण्याच्या पाण्याची गरज आणि शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा समतोल साधावा. पाण्याचे योग्य वर्गीकरण करून नियोजनबद्ध पद्धतीने पाणीवाटप केल्यास दोन्ही गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करता येतील, अशी भूमिका शंकरअण्णा धोंडगे यांनी मांडली आहे.

पावसाअभावी आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करणे अन्यायकारक ठरू शकते. त्यामुळे जलाशयातील उपलब्ध पाणीसाठा, पिकांची स्थिती आणि शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्या!
शेतकरी हा जबाबदार नागरिक असून त्याच्या अडचणी समजून घेणे प्रशासनाची जबाबदारी आहे. जलाशय परिसरातील शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याबाबत एकतर्फी निर्णय घेण्याऐवजी संबंधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विचार करावा. पिकांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी धोंडगे यांनी मागणी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी दिलीप धोंडगे, गजानन कराळे, भास्कर पाटील कोडगावकर, ज्ञानोबा तिडके, अच्युतराव मेटकर, शिवाजीराव धानोरकर, जीवन वडजे, अशोकराव सोनवळे, सचिन जारीगोटे, रहीम खान फुलाजी ताटे, पिंटू बाबर विष्णू कल्याणकर, गौस शेख, नारायण मेकलवाड, विलास हुंबाड, संतोष कागणे, मनमत कल्याणकर, ज्ञानदेव भागनगरे, माधव गंदलपवाड, शेख आवेश यांच्यासह आदी शिवसेना कार्यकर्ते व पदअधिकारी उपस्थित होते.

प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा; अन्यथा या भूमिकेविरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी दिला आहे. त्यामुळे आता प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments