16 special train trips between Huzur Sahib Nanded and Tirupati नांदेड| अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, दक्षिण मध्य रेल्वे नांदेड ते तिरुपती दरम्यान खालीलप्रमाणे विशेष गाड्या चालवणार आहे. अशी माहिती दक्षिण रेल्वे विभागाने प्रसिद्धीस दिली आहे.


अनु क्र गाडी क्र. कुठून – कुठे प्रस्थान आगमन दिनांक
1 07189 नांदेड – तिरुपती 16.30(शुक्र) 12.30 (शनि) 04.07.25 ते 25.07.25
2 07190 तिरुपती – नांदेड 14.20 (शनि) 09.30 (रवि) 05.07.25 ते 26.07.25
3 07015 नांदेड – तिरुपती 16.50 (शनि) 10.10 (रवि) 05.07.25 ते 26.07.25
4 07016 तिरुपती – नांदेड 16.40 (रवि) 13.15 (सोम) 06.07.25 ते 27.07.25

गाडी क्रमांक 07189/07190 नांदेड – तिरुपती – नांदेड स्पेशल (08 फेऱ्या ): या विशेष गाड्या मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, कामारेड्डी, मेडचल, चेरलापल्ली, नलगोंडा, मिर्यालागुडा, नाडीकुडे, पिदुगुरल्ला, नेमलीपुरी, रोमपिचेर्ला, विनुकोंडा, डोनाकोंडा, मरकापुरम रोड, कुंबम, गिद्दलूर, दिगुवामेट्टा, नंदयाल, जम्मालामादुगु, येरागुंतला, कडप्पा, नांदलूर, रझाम्पेटा, कोदुरू आणि रेनिगुंटा या स्टेशन दोन्ही दिशांना थाबतील. या विशेष गाड्यांमध्ये 2AC, 3AC, स्लीपर आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.

गाडी क्रमांक 07015/07016 नांदेड – तिरुपती – नांदेड स्पेशल (08 फेऱ्या): या विशेष गाड्या मुदखेड, बासर, निजामाबाद, कामारेड्डी, मेडचल, मलकाजगिरी, काचीगुडा, उमदानगर, शादनगर, जेडचेरला, महबूबनगर, वानपर्थी रोड, गडवाल, कर्नुल सिटी, ढोण, गुत्ती, ताडीपत्री, येरागुंतला, कडप्पा, ओंतीमिटा, राझमपेटा, रेनिगुंटा या रेल्वे स्थानकांवर दोन्ही दिशांना थाबतील. या विशेष गाड्यांमध्ये 1AC, 2 AC, 3AC, स्लीपर आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.
