HomeकरियरRetired teacher : सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाशी सेवानिवृत्त शिक्षक आजही कायम ॲड.जाधव

Retired teacher : सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाशी सेवानिवृत्त शिक्षक आजही कायम ॲड.जाधव

Retired teacher still with Sevadas Education Promotion Board Adv. Jadhav नवीन नांदेड| सेवादास परिवारातील सदस्य सेवानिवृत्त होत असले तरीही आमच्या कुटुंबातील सदस्य जबाब दारी मुक्त झाले असले तरीही ते कायम आमच्या सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाला जोडले गेले असल्याचे सांगून अध्यापन साठी दैनंदिन शाळेत यावे असे विनंती संस्था कोषाध्यक्ष ॲड.श्रीनिवास जाधव यांनी केले.

सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा गांधी हायस्कूल सिडको येथील सह शिक्षक सुर्यभान मोरे व महात्मा गांधी प्राथमिक शाळेचे अशोक निवळे हे प्रदिर्घ सेवेनंतर 30 जुनं 25 रोजी सेवानिवृत्ती निमित्ताने शाळेच्या वतीने कोषाध्यक्ष ॲड.श्रीनिवास जाधव, सदस्य निलम जाधव,भाग्यश्री जाधव, यांच्या सह मुख्याध्यापक एस.जी.शेख व संजय कानोटे व महात्मा गांधी बिएड महाविद्यालय सिडकोचे प्राचार्य घुले यांच्या सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सेवापुर्ति सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी प्राचार्य घुले यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना व शाळेतील विद्यार्थ्यांना सहकार्य करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करावे असे मनोगत व्यक्त केले.तर सहशिक्षक राऊत यांनी आपल्या भाषणातून सेवा काळात केलेल्या कार्याची उल्लेखनिय माहिती देऊन आठवणीना उजाळा दिला. निरोप सोहळ्यात मोरे यांनी सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब जाधव व पदाधिकारी यांच्ये आभार मानले तर निवळे यांनी महात्मा गांधी प्राथमिक शाळेत गुणवत्ता वाढीसाठी सह शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची माहिती दिली.

या सोहळ्याला भाऊराव मोरे,माजी सरपंच दता पाटील मोरे,राजु मोरे,काळबा मोरे, संदीप मोरे यांच्यी उपस्थिती होती. सुत्रसंचलन एन.एस. ढवळे यांनी केले,या सोहळ्याला माध्यमिक व प्राथमिक शाळेतील शिक्षक वृंद व परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेतील विध्यार्थ्यांना सेवानिवृत्त निमित्ताने दोन्ही शिक्षकांनी शालेय साहित्य वाटप केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments