Homeनांदेडकांशीराम-मायावतींच्या त्यागातून बहुजन समाज पक्षाची निर्मिती : इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर

कांशीराम-मायावतींच्या त्यागातून बहुजन समाज पक्षाची निर्मिती : इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर

हिमायतनगर येथे बसपाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात बूथस्तरावरील संघटन बळकटीकरणावर भर

हिमायतनगर, प्रतिनिधी| मान्यवर कांशीरामजी आणि बहन मायावतीजी यांच्या असीम त्यागातून बहुजन समाज पक्षाची निर्मिती झाली आहे. बहुजन समाजाच्या हितासाठी दोन्ही नेत्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यामुळे इतर पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची तुलना होऊ शकत नाही, असे प्रतिपादन बसपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले.

हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने हिमायतनगर येथील शासकीय विश्रामगृहात २३ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी बसपाचे नांदेड जिल्हा प्रभारी शिवाजी सोनटक्के, महिला जिल्हा महासचिव जयश्री राऊत, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर कांबळे आणि पत्रकार विजयकुमार वाठोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संजय गुंडेकर यांची बसपाच्या हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडीनंतर त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विचारधारा समजून घेण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक – कार्यकर्त्यांनी संघटनात्मक बांधणी करताना पक्षाची विचारधारा समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशिक्षण शिबिरांची भूमिका महत्त्वाची आहे, असे देगलूरकर यांनी सांगितले. पक्षाच्या विचारधारेचा सातत्याने प्रचार व प्रसार करून संघटन मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

बहुजन समाज पक्षाच्या स्थापनेमागे कांशीराम आणि मायावती यांचा मोठा त्याग आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विचारधारेवर ठाम राहून संघटनात्मक कामाला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. संविधानाच्या संरक्षणासाठी बहुजन समाज पक्षाची भूमिका महत्त्वाची असल्याचा दावा करत देगलूरकर यांनी कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले. स्वतःची राजकीय सत्ता प्राप्त करणे हा बसपाच्या राजकीय कार्यक्रमाचा प्रमुख भाग असल्याचेही त्यांनी सांगितले.

1073275 कांशीराम-मायावतींच्या त्यागातून बहुजन समाज पक्षाची निर्मिती : इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर

बूथस्तरावर संघटन मजबूत करण्याचे आवाहन – आगामी राजकीय वाटचाल तसेच बूथ स्तरापासून पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत बसपाचे नांदेड जिल्हा प्रभारी शिवाजी सोनटक्के यांनी मार्गदर्शन केले. हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात बहुजन समाज पक्षाची वाटचाल दमदारपणे सुरू असल्याचे विधानसभा अध्यक्ष साहेबराव नरवाडे यांनी सांगितले. यावेळी प्रा. विजयकुमार भरणे यांनी सूत्रसंचालन केले. सुधाकर कांबळे, विधानसभा उपाध्यक्ष गुलाब दवणे आणि हिमायतनगर महिला तालुकाध्यक्षा प्रतिभा नरवाडे यांनीही विचार मांडले.

शिबिरास दशरथ डोंगरे, विजय राऊत, मा. पाईकराव, अंजना पंडित नरवाडे, मालनबाई यादव लोकडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन विधानसभा महासचिव धम्मपाल मुनेश्वर यांनी केले. दरम्यान, हिमायतनगर येथे लवकरच व्यापक स्वरूपाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार असून, त्यासाठी तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments