HomeनांदेडSahasrakund waterfall : निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा सहस्त्रकुंड धबधबा ओसडून वाहू लागला

Sahasrakund waterfall : निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा सहस्त्रकुंड धबधबा ओसडून वाहू लागला

किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट तालुक्यातील निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा सहस्रकुंड धबधबा हा गेल्या चार महिन्यापासून पैनगंगा नदी पात्राला पाणी नसल्यामुळे खंडित झाला होता. गेल्या दोन दिवसापासून चालू असलेल्या सततधार पावसामुळे सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहताना पहावयास मिळत आहे. त्यामुळे पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.

विदर्भ मराठवाडा सीमेवर वसलेला नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा हा पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे. गेल्या दोन दिवसापासून चालू असलेल्या सतत धार पावसामुळे निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा सहस्त्रकुंड धबधबा हा ओसंडून वाहू लागला आहे. धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी मराठवाड्यातूनच नव्हे तर तर मुंबई, पुणे, हैदराबाद, म्हैस, निझामाबाद, दिलाबाद यासारख्या ठिकाणाहून या पर्यटन स्थळाला पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. पाण्याअभावी धबधबा खंडित झाल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला होता.

IMG 20250626 WA0043 Sahasrakund waterfall : निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा सहस्त्रकुंड धबधबा ओसडून वाहू लागला

सद्यस्थितीत या ठिकाणी पर्यटकांना राहण्यासाठी कुठलीही लॉजिंग सारखी किंवा रिसोड सारख्या सुविधा नसल्यामुळे या पर्यटन स्थळाचा पुरेपूर पर्यटकांना आनंद घेता येईना. नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांच्या कालावधीमध्ये या पर्यटन स्थळाच्या विकासाना चालना मिळाली होती पण त्यानंतर कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या पर्यटन स्थळाकडे लक्ष न दिल्यामुळे या पर्यटन स्थळाचा विकास खुंटला. नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राहुल कर्डिले यांनी या पर्यटन स्थळाकडे लक्ष वेधावे अशी मागणी या भागातील जनतेतून पुढे येत आहे.

IMG 20250626 WA0042 Sahasrakund waterfall : निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा सहस्त्रकुंड धबधबा ओसडून वाहू लागला

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments