नांदेड| हैदराबाद येथील संतश्री भटजी बापू महाराज मठाचे व्यवस्थापक भगवान महाराज जोशी (६८) यांचे प्रदीर्घ आजारानंतर आज दुपारी निधन झाले.


हैदराबाद येथील संतश्री भटजी बापू महाराज संस्थानचे गेल्या अनेक वर्षापासून व्यवस्थापन करणारे भगवान महाराज जोशी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. संस्थानच्या विश्वस्तांसोबत समन्वयाची भूमिका घेत त्यांनी या संस्थानला नावारुपास आणले होते. नुकत्याच झालेल्या संस्थानच्या संतश्री भटजी बापू महाराज यांच्या ९३ व्या प पुण्यतिथी महोत्सवात आजारी असतानाही २२ मे ते २४ मे या दरम्यान ते सहभागी झाले होते.

त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि आज दुपारी त्यांचे दुःखद निधन झाले. आज सायंकाळी त्यांच्यावर हैदराबाद येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संस्थानचे विश्वस्त तसेच मोठ्या प्रमाणात भक्तगण व नातेवाईक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, नातवंडे असा परिवार आहे. दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी यांचे ते चुलत भाऊ होत. त्यांच्या अकाली निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
