नवीन नांदेड| पुणे व अहिल्यानगर येथिल बैठकीनंतर नांदेड जिल्ह्यातील मराठा समाजाच्या विवाह सोहळ्यातील आचार संहिता ठरवन्यासंदर्भात 9 जुन रोजी बैठकीचे आयोजन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे,तत्पूर्वी ही बातमी बाहेर येताच सदरील बैठकीत ठरवण्यात येणाऱ्या आचार संहितेच्या नुसार नांदेड जिल्ह्यात पहिला लग्न समारंभ हडको येथिल गोविंद गार्डन येथे पार पडला.


बाभुळगाव येथिल मस्के पाटील परिवार व काकांडी येथिल बागल पाटील परिवार यांच्या अतिशय समजदार पनाच्या भूमिकेतुन वर चि.अविनाश गोविंदराव मस्के बाभुळगावकर व वधु चि.सौं.का. कोमल शिवाजीराव बागल कांकाडीकर या नवदाम्पत्यांचा साखरपुडा समारंभ दि.07 जुन रोजी करण्याचे योजिले होते, दरम्यान मोजकेच पाहुणे मंडळी, आप्तस्वकीय,नातेवाईक यावेळी उपस्थित होते,तेव्हा सदरील ठिकाणी मराठा समाजाच्या नविन आचार संहितेसंदर्भात चर्चा करण्यात आली व दोन्ही गावातील सरपंच, उपसरपंच तसेच नातेवाईकतील काही प्रमुख व प्रतिष्ठित व्यक्ति एकत्र येत मराठा समाजाच्या नविन आचार संहितेचे तंतोतंत पालन करीत मोजक्याच लोकात व कुठलाही बडेजाव पणा न करता अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने विवाह सोहळा आटोपण्यात आला.

यावेळी सुर्यभान भाऊराव मोरे,सरपंच पुंडलिक मस्के, माजी सरपंच अशोक मोरे,बाबाराव मस्के,पोलीस पाटील संतोष मोरे, चंद्रभान कुरे,विश्वनाथ मस्के,चक्रधर मस्के,मधुकर मस्के, नारायण घोगरे, व मुलीकडील जयदिप बागल, माजी सरपंच सुदीन बागल,विलास माधवराव बागल ,ऊतम दतराम बागल,सिताराम बालाजी बागल,दशरथ सदबा पाटील बागल,व्यंकोबा पाटील बागल,काळेश्वर बागल ,रघुनाथ बालासाहेब चव्हाण,यांनी दोन्ही कडील पाहुणे मंडळी यांना होणाऱ्या अवाढव्य खर्च पाहता व मराठा समाजाणे शुभविवाह साठी दिलेल्या आचारसंहितेचे पालन या बाबत सविस्तर चर्चा केली व जनजागृती केल्यानंतर दोन्ही पाहुणे मंडळींकडून शुभविवाह साठी होकार मिळताच शुभविवाह तयारी सुरू झाली. अखेर दुपारी दोन वाजता मोजक्या पाहुण्यांच्या व उपस्थित कुटूंबातील सदस्यांचा उपस्थित हा शुभविवाह संपन्न झाला.

जिल्ह्यातील मराठा शुभविवाह आचार संहिता लागू झाल्यानंतर पहिलाच विवाह हा संपन्न झाला वरवधु दोन्ही मंडळींनी घेतलेल्या भूमिकेमुळे हा साक्षगंध सोहळा शुभविवाह झाला.बागल व मस्के परिवाराचा शुभविवाह आदर्श जिल्हा यातील समाज बांधवांनी घ्यावा असे आवाहन उपस्थितांनी केले. यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक सौ.सुचिता शाम वडजे यांनी ही वार्ता कळताच पुष्पगुच्छ घेऊन उपस्थित राहिल्या व नववधू वर यांना आशिर्वाद दिला.
