प्रामाणिकपणाचा आदर्श : टायगर संघटनेच्या ऑटोचालकाने ४० हजारांचा मोबाईल प्रामाणिकपणे परत केला
नांदेड | आजच्या धावपळीच्या युगात प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला असताना, नांदेडमध्ये घडलेल्या एका घटनेने समाजात माणुसकी आणि सचोटी अजूनही जिवंत असल्याचा विश्वास दृढ केला आहे. टायगर ऑटो रिक्षा चालक संघटनेचे सदस्य खयुम पठाण यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा सध्या शहरात कौतुकाचा विषय ठरत आहे.
दि. २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता, रिक्षा क्रमांक MH-26 BD 2335 चालवत असताना खयुम पठाण (रा. नुरी चौक, महेबूब नगर, नांदेड) यांच्या रिक्षातून संगीता रवींद्र आनंदास (रा. अण्णाभाऊ साठे चौक, दत्तनगर, नांदेड) या दोन महिला प्रवाशांनी बरकी चौक ते अण्णाभाऊ साठे चौक असा प्रवास केला. प्रवासानंतर त्या घरी गेल्यावर लक्षात आले की त्यांचा पर्स व सुमारे ४० हजार रुपये किमतीचा Vivo कंपनीचा मोबाईल फोन रिक्षातच राहून गेला आहे.
घाईने मोबाईलवर संपर्क साधला असता, रिक्षा चालक खयुम पठाण यांनी तत्काळ फोन उचलून “म...









