नांदेड l शिक्षणाची जननी क्रांतीजोती माता सावित्री फुले यांच्या ९४ व्या जयंती निमित्ताने सीटू कामगार संघटनेच्या वतीने महापालिके सुरु असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी अभिवादन करण्यात आले.
नांदेड वाघाळा महानगर पालिके समोर पूरग्रस्तांचे मागील २ डिसेंबर पासून साखळी उपोषण सुरु आहे.
त्या साखळी उपोषणाच्या ठिकाणी ही जयंती साजरी करण्यात आली. यापूर्वी देखील माकप आणि सीटू च्या वतीने अनेक महामानवांच्या जयंत्या व स्मृतिदिने शासकीय कार्यालया समोर साजरे करण्यात आले आहेत.
यावेळी घोषणा देत, ओपचारिक भाषणे झाली. या अभिवादन कार्यक्रमात कॉ.उज्वला पडलवार, कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ. करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड, कॉ.डॉ.यास्मिन पठाण,कॉ. जयराज गायकवाड, कॉ.ऍड. प्रशांत कोकणे, कॉ.रमेश गायकवाड, कॉ.बालाजी पाटील भोसले, कॉ.सूरज सरोदे यांच्यासह इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.