श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा। 4 जानेवारी- माळेगाव यात्रा दक्षिण भारतात अतिशय प्रसिद्ध असून ही यात्रा सांस्कृतिक व सामाजिक उत्सवाचा वारसा आहे. येथे जुन्या कपड्यांची खास बाजारपेठ भरते. सुमारे शंभरपेक्षा जास्त जुन्या कपडयाचे दुकाने येथे दरवर्षी येतात.
माळेगाव यात्रेतील जुन्या कपड्यांचा बाजार हा मुख्य आकर्षण आहे. गोरगरीब कुटुंबांसाठी हा बाजार वर्षभर पुरणाऱ्या कपड्यांची खरेदी करण्याचे ठिकाण म्हणून प्रसिघ्द आहे. येथे मोठ्या व्यक्तींचे ड्रेस 40 रुपयांत, साड्या 20 रुपयांत, तर लहान मुलांचे कपडे फक्त 15 ते 20 रुपयांत विकले जातात. शर्ट, टी-शर्ट, बरमूडा, टॉप, कोट, ब्लाउज, शाल, स्वेटर, बेडशीट, मफरेल, पंजाबी सूट, पडदे यांसारख्या वस्तूंवरही खरेदीदारांची मोठी गर्दी असते.
नांदेड, निजामाबाद, सोलापूर, लातूर, औसा, परभणी आदी ठिकाणवरुन व्यापारी येथे देकाने लावतात. यात्रेत शंभर सव्वासे जुने कपड्यांची दुकाने असतात. दहा रुपयांपासून सत्तर रुपयांपर्यंतच्या किमतीत विविध वस्त्र खरेदीसाठी येथे उपलब्ध आहेत.
गोरगरीब लोकांसाठी माळेगाव यात्रा एक वरदानच ठरते. वर्षभराची कपड्यांची गरज पूर्ण करण्यासाठी येथे मोठ्या संख्येने नागरिक येतात. या यात्रेच्या माध्यमातून अनेकांना किफायतशीर दरात कपडे खरेदी करता येतात, तसेच व्यापाऱ्यांनाही आर्थिक लाभ मिळतो.
माळेगाव यात्रा केवळ बाजारपेठ नव्हे तर सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवत ही यात्रा विविधतेत एकता जपणारी यात्रा आहे. उपजीविकेसाठी भारतभर भ्रमंती करणाऱ्या वैदू, कैकाडी, घिसाडी, मसनजोगी, राईंदर, नंदीवाले व इतर भटक्या जमातीच्या पर्वी माळेगावात जातपंचायती भरत होते. आता ही प्रथा बंद झाली आहे. येथे पूर्वी अनेक सोयरीकी ठरत असत. तसेच नवविवाहित दाम्पत्यांसाठीही कपड्यांची खरेदी या बाजारातून केली जात असल्याची आठवण सोलापूरच्या व्यापा-यांनी सांगीतली.