Malegaon Yatra ; माळेगाव यात्रेत जुन्या कपडयांचा महाउत्सव – NNL
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा। 4 जानेवारी- माळेगाव यात्रा दक्षिण भारतात अतिशय प्रसिद्ध असून ही यात्रा सांस्कृतिक व सामाजिक उत्सवाचा वारसा आहे. येथे जुन्या कपड्यांची खास बाजारपेठ भरते. सुमारे शंभरपेक्षा जास्त जुन्या कपडयाचे दुकाने येथे दरवर्षी येतात.
माळेगाव यात्रेतील जुन्या कपड्यांचा बाजार हा मुख्य आकर्षण आहे. गोरगरीब कुटुंबांसाठी हा बाजार वर्षभर पुरणाऱ्या कपड्यांची खरेदी करण्याचे ठिकाण म्हणून प्रसिघ्द आहे. येथे मोठ्या व्यक्तींचे ड्रेस 40 रुपयांत, साड्या 20 रुपयांत, तर लहान मुलांचे कपडे फक्त 15 ते 20 रुपयांत विकले जातात. शर्ट, टी-शर्ट, बरमूडा, टॉप, कोट, ब्लाउज, शाल, स्वेटर, बेडशीट, मफरेल, पंजाबी सूट, पडदे यांसारख्या वस्तूंवरही खरेदीदारांची मोठी गर्दी असते.
नांदेड, निजामाबाद, सोलापूर, लातूर, औसा, परभणी आदी ठिकाणवरुन व्यापारी येथे देकाने लावतात. यात्रेत शंभर सव्वासे जुने कपड्या...
