हिमायतनगर,अनिल मादसवार| माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांच्या वाढदिवसा निमित्ताने हिमायतनगर शहर व तालुक्यातील शिवसैनिकांनी मारोती मंदिरात महाआरती आणि रुग्णांना फळ वाटप करून बाजार केला आहे.
हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हिमायतनगर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांनी बोरगडी येथील नवसाला पावणाऱ्या मारुती मंदिरात शनिवारी सकाळी महाआरती करून दीर्घ आयुष्याची कामना केली. त्यानंतर हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करून माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांचा वाढदिवस साजरा केला.
यावेळी जेष्ठ शिवसैनिक सत्यव्रत ढोले, दशरथ गोसलवाड, वसंत डवरे, प्रकाश जाधव, विकास पाटील देवसरकर, विजय वळसे, संटी कप्पलवाड, राजेश जाधव, राजू पाटील शेलोडेकर, गजानन हरडपकर, फेरोज कुरेशी, रमेश गुड्डेटवार, प्रकाश हंपोलकर, प्रभाकर क्षीरसागर, विकास नरवाडे, काइतवाड वडगावकर, रामदास भडंगे, साहेबराव चव्हाण, सुनील चव्हाण, सावन डाके, गौरव सूर्यवंशी, आदींसह शेकडो शिवसेना पदाधिकारी, जेष्ठ व युवा शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.