Homeक्राईमThift : मारतळयात ‌एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला ; पण मोबाईल शाॅपी‌ फोडून...

Thift : मारतळयात ‌एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला ; पण मोबाईल शाॅपी‌ फोडून ५७ हजार पळविले

उस्माननगर, माणिक भिसे l मारतळा‌ ( ता‌. लोहा ) येथील नांदेड – हैदराबाद महामार्गावरील मुख्य बाजारपेठेतील खासगी एटीएम फोडून रोख रक्कम पळविण्याचा अज्ञात चोरट्यांचा प्रयत्न फसला . पण‌ ‌ शेजारी असलेल्या समर्थ मोबाईल शॉपीचे शटर ‌फोडून ५० हजार, व ७ हजाराचा मोबाईल असा एकूण ५७ हजारांचा‌ मुद्देमाल चोरटयानी पळविल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे.

मारतळा‌ येथील मुख्य बाजारपेठेतील खासगी‌ एटीएम फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांकडून फसला. मात्र एटीएम मशीनची चोरट्यांनी मोडतोड करून मोठे नुकसान केले. ‌ तर शेजारीच असलेल्या समर्थ मोबाईल शॉपीचे शटर तोडून गल्ल्यातील ५० हजार‌ व‌ एक ७ हजार‌ रुपये किंमतीचा‌ मोबाईल ‌असा‌ एकूण ५७ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला असून‌ घटनास्थळी श्वान‌ व ठसे तज्ज्ञांनाचे पथकाला पाचारण करण्यात आले‌ होते.

श्वानाने‌ कांहीं‌ अंतरापर्यंत माग‌ काढला‌ , मार्केटमधील एका दुकानासमोर तो घुटमळला ‌. याप्रकरणी फिर्यादी विकास भास्करराव सावळे ‌ यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोट्यांविरुध्द‌ गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश मुळीक हे करीत आहेत .

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments