नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच प्रदेशउपाध्यक्ष मा. भास्करराव काका काळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मंगळवार दि.१२ नोव्हेंबर रोजी शेतकरी नेते व आम्ही जरांगे चित्रपटाचे निर्माते तसेच प्रतिथयश दंतरोग तज्ञ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जळगाव येथे प्रवेश केला आहे .
डॉ. दत्ता मोरे यांनी शेतकरी आणि सामाजिक चळवळीत कार्य केले..किसान ब्रिगेड चा मराठवाडा विभागीय अध्यक्ष, शेतकरी शेतमजूर पंचायत युवाप्रमुख च्या माध्यमातून शेतकरी आणि शेतमजूरांच्या प्रश्नावर विविध आंदोलने करून आवाज उठवला.तसेच वैद्यकीय क्षेत्रात योगदान देत असतांना ज्वलंत झालेला मराठा आरक्षणाचा प्रश्न जगापुढे मांडण्यासाठी ” आम्ही जरांगे- गरजवंत मराठ्यांचा लढा ” या चित्रपटाची निर्मिती केली.
यात माझे मित्र व चळवळीतील अनेक सहकार्यानी मला वेळोवेळी सहकार्य केले, त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार त्यांनी मानले आहेत. पुढे ते म्हणाले की चळवळतील अनुभवाची शिदोरी भविष्यात राजकारणामध्ये मला उपयोगी येईल असे डॉ. दत्ता मोरे यांनी या प्रवेशाप्रसंगी नमूद केले आहे