नांदेड, अनिल मादसवार| जातनिहाय जनगणना मला मंजुर नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर करावे, उगाच कॉंग्रेसचे नाव बदनाम करू नये असे प्रतिपादन तेलंगणा राज्याचे माजी मंत्री तथा सध्या तेलंगणा शासनाचे सल्लागार शब्बीरअली यांनी केले.
पंडीत जवाहरलाल नेहरु दिन आणि बालक दिनाानिमित्त दि. 14 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात देशाचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत. त्या संदर्भाने बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शब्बीर अली हे बोलत होते. त्यांच्या सोबत तेलंगणातील जहीराबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेशकुमार शेटकार, अखील भारतीय कांग्रेस कमिटीच्या सचिव झरीता, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, प्रदेश सचिव ऍड. घोडजकर, एकनाथ मोरे, बापु पाटील आणि मुन्तजिब यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलतांना शब्बीर अली म्हणाले की, उगीचच काँग्रेसचे नाव बदनाम करत नरेंद्र मोदी जाती-पातींच्या विषयी बोलत असतात. यापुर्वी बिहार राज्यात जातनिहाय जनगणना झाली आहे. सध्या तेलंगणा राज्यात सुध्दा जात निहाय जनगणना सुरू आहे. काय झाले बिहारमध्ये आणि काय होणार आहे तेलंगणामध्ये आणि काय होईल देशात असे अने प्रश्न उपस्थित करत निवडणुकीच्या कालखंडात मोदी यांना जात आठवते. जी भारतीय संविधान कधीच सांगितलेली नाही.
हिम्मत असेल तर त्या असे जाहीर करावे की, मला जातनिहाय जनगणना नको आहे कारण बिहार राज्यात नुकतीच जात निहाय गणना झाली आहे तसेच जातानहाय जनगणना झाला आह. सध्या तलंगणा राज्यात सुध्दा जात निहाय जनगणना सुरु आहे. काय झाले बिहारमध्ये आणि काय होणार आहे तेलंगणामध्ये आणि काय होईल देशात असे अनेक प्रश्न उपस्थित करत निवडणुकीच्या कालखंडात नरेंद्र मोदी यांना जात आठवते.
जी भारतीय संविधानाने कधीच सांगितलेली नाही. हिम्मत असेल तर त्यांनी असे जाहीर करावे की, मला जातनिहाय जनगणना मंजुर नाही. आपसात विद्वेष होईल अशी नारे बाजी करून निवडणुक जिंकता येत नसते. निवडणुक जिंकण्यासाठी विकासाच्या मुद्यांची आवश्यकता असते. तेलंगणा राज्यात एकाच परिसरात विविध जात धर्मांच्या विद्यार्थ्यांना एकत्रीत ठेवून त्यांना शिक्षण देण्याची एक योजना आखली आहे. त्यावर काम सुरू आहे. असे काही देशासाठी नरेंद्र मोदींनी विचार करावा आणि मते मागावी.
तेलंगणा राज्य तयार झाले तेंव्हा राज्याचा खजीना हा जमा स्वरुपात होता. यावर बोलतांनाा शब्बीर अली म्हणाले की, राज्य चालविण्यासाठी कर्ज घ्यावेच लागते. सध्या बीआरएसकडून आम्ही सत्ता खेचून आणली तेंव्हा आमच्यासमोर 17 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. पण आम्ही अत्यंत सुनियोजितपणे त्या कर्जाची परतफेड करू, जनतेच्या कल्याणाची कामे करू आणि विकासांच्या योजनांवर भर देवू. नांदेड जिल्ह्यात उद्या नांदेड शहरात नवा मोंढा मैदानात भारताचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी यांच्या सभा होणार आहेत. आपल्या माध्यमातून आम्ही जन आवाहन करतो की, या सभांना उपस्थित राहुन आपल्या मनातील भावना व्यक्त कराव्यात विकासाची गंगा आपल्या मतदार संघामध्ये आणण्यासाठी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून विजयी करावे असे आवाहन शबिर अली यांनी केले