नवीन नांदेड| जिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड,व नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका यांच्या वतीने नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी व नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघ निवडणुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सेल्फी पाईंटचे उद्घाटन सिडको वृत्तपत्र विक्रेता टिनशेड सेंटर येथे जेष्ठ नागरिक आनंदराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी व नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघ निवडणुकीसाठी निवडणूक होत असुन जिल्हा प्रशासनाने व नावा मनपाच्या सहाय्याने आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशानुसार उपायुक्त अजितपाल संधु यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सिडको वृत्तपत्र विक्रेता टिनशेड येथे सेल्फी पाईंट उपलब्ध करून देण्यात आले आहे.
मतदान टक्केवारी वाढविण्या साठी मि मतदान करणार, सेल्फी पाईंटचे उद्घाटन जेष्ठ नागरिक आनंदराव गायकवाड, यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिवन पाटील घोगरे, दिंगबर शिंदे धनेगावकर, राजेश कदम, विठ्ठल घाटे, दौलतराव कदम, यांच्या सह नविन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर, किरण देशमुख, तिरूपती पाटील घोगरे,सारंग नेरलकर, वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे अध्यक्ष सतिश कदम,डोईबळे व वृत्तपत्र विक्रेते, नागरिक उपस्थित होते, यावेळी युवक ,जेष्ठ नागरीक , महिला यांच्या सह अनेकांनी सेल्फी काढुन घेऊन आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून घेतल्या आहेत.