Wednesday, May 13

Tag: with enthusiasm

Agriculture Department : कृषी विभागातून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा स्नेहभोजन व सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

Agriculture Department : कृषी विभागातून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा स्नेहभोजन व सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

कृषी, नांदेड
नांदेड, विशेष प्रतिनिधी | कृषी विभागातून प्रदीर्घ सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचा सन्मान व स्नेहभोजन कार्यक्रम सोमवार, दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी वजिराबाद रोडवरील हॉटेल दुर्वांकुर, नांदेड येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन व संकल्पना दिलीप अनगुलवार व प्रम्हानंद अनमोड यांनी मांडली होती. ५८ वर्षांची सेवा पूर्ण करून सुमारे ३३ वर्षे कृषी विभागात कार्यरत राहिल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा एकत्र आणून स्नेहभाव जपावा, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. सेवानिवृत्तीनंतर अनेक अधिकारी वैयक्तिक आयुष्यात व्यस्त होत असल्याने सहकाऱ्यांशी संपर्क कमी होतो. मात्र, इतकी वर्षे खांद्याला खांदा लावून काम केलेल्या सहकाऱ्यांशी पुन्हा संवाद साधावा, आठवणींना उजाळा द्यावा आणि स्नेहबंध दृढ करावेत, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमास कृषी अधिकारी,...
Jayanti celebrated : राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

Jayanti celebrated : राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

करियर, नांदेड
नांदेड| नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित सायन्स कॉलेजच्या मुलांच्या वस्तीगृहात सोमवार (दि.१२ जानेवारी) रोजी राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ एलपी शिंदे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील, डॉ. बालाजी कोंपलवार, पीपल्स कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. अशोक सिद्धेवाड यांची उपस्थिती होती. प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील, डॉ. बालाजी कोंपलवार, पीपल्स कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. अशोक सिद्धेवाड यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला व उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमा...
Constitution Day celebrated : पीपल्स कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

Constitution Day celebrated : पीपल्स कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

नांदेड, करियर
नांदेड| भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त पीपल्स कॉलेज, नांदेड येथे संविधान दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. भारताच्या घटना परिषदेने अथक परिश्रमांनंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना अर्पण केली होती. या ऐतिहासिक घटनेला आज ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत. कार्यक्रमाची सुरुवात प्रभारी प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर यांच्या हस्ते राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून झाली. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे पूजन करण्यात आले व सर्व उपस्थितांनी सामूहिकरित्या संविधान उद्देशिकेचे वाचन केले. या निमित्ताने "भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये" या विषयावर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अभय दातार यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या भाषणात डॉ. दातार यांनी भारतीय राज्यघटनेतील मूलभूत तत्वे, तिची वैशिष्ट्ये तसेच इतर देशा...
Raising Day : सीआरपीएफचा 87 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा

Raising Day : सीआरपीएफचा 87 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मुदखेड येथे सेंट्रल ट्रेंनिग महाविद्यालयात, केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स (सीआरपीएफ) दलाचा 87 वा स्थापना दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महानिरीक्षक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य ख्वाजा सजनुद्दीन यांनी सर्व अधिकारी, जवान आणि त्यांच्या कुटूंबियांना शुभेच्छा देवून सीआरपीएफ दलाच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला. सीआरपीएफची स्थापना 27 जुलै 1939 रोजी नीमच मध्यप्रदेश येथे क्राऊन रिप्रेझेंटेटिव्हज पोलीस म्हणून झाली. स्वातंत्र्यानंतर त्याची पुनर्रचना केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणून करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी 27 जुलै हा दिवस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळी महानिरीक्षकांनी शहीद सैनिकांना श्रध्दांजली वाहिली. क्वार्टर गार्डमध्ये त्यांना मानवंदना देण्यात आली आणि विशेष सैनिक संमेलनाला संबोधित करताना त्यांनी देशसेवेतील सैन्याच्या शिस्त, वचनबद्धता आणि योगदानाचे क...
Sepkatakarau Competition : राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ स्पर्धा उत्साहात संपन्न -NNL

Sepkatakarau Competition : राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ स्पर्धा उत्साहात संपन्न -NNL

स्पोर्ट्स, नांदेड
नांदेड| जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने व नांदेड जिल्हा सेपकटाकरॉ असोसिएशन यांचे सहकार्याने सुरु असलेल्या राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ (14 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धा 3 ते 5 डिसेंबर, 2024 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे संपन्न झाली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे हे तर प्रमुख अतिथी म्हणुन तालुका क्रीडा संयोजक, नायगांव तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक जीवन पवार, क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर, निवड समिती सदस्य गणेश माळवे, निवड समिती सदस्य दर्शन हस्ती, निवड समिती सदस्य रवीकुमार बकवाड, क्रीडा शिक्षक विनोद जमदाडे आदी उपस्थित होते. या स्पर्धेत पुणे व नाशिक विभागाचे वर्चस्व राहीले असून स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहे. 14 वर्षे मुले- प्रथम- पुणे विभाग, द्विती...

District level youth festival started with enthusiasm : जिल्हास्तरीय युवा महोत्सवास उत्साहात सुरुवात -NNL

करियर, नांदेड
नांदेड| क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठ व युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 01-02 डिसेंबर,2024 या कालावधीत मंच क्रं.01- जिल्हा क्रीडा संकुल, बास्केटबॉल मैदान, नांदेड, मंच क्रं. 02- डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडियम परिसर, नांदेड व मंच क्रं.03- जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड, या ठिकाणी करण्यात आले. या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उदघाटन आज 01 डिसेंबर,2024 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती सान्वी जेठवाणी (राज्य निवडणुक दुत,भारत सरकार), श्रीमती चंदा रावळकर (युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, नांदेड), मा.श्रीमती कविता जोशी (जिल्हा ...
error: Content is protected !!