HomeनांदेडConstitution Day celebrated : पीपल्स कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

Constitution Day celebrated : पीपल्स कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

नांदेड| भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त पीपल्स कॉलेज, नांदेड येथे संविधान दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. भारताच्या घटना परिषदेने अथक परिश्रमांनंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना अर्पण केली होती. या ऐतिहासिक घटनेला आज ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात प्रभारी प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर यांच्या हस्ते राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून झाली. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे पूजन करण्यात आले व सर्व उपस्थितांनी सामूहिकरित्या संविधान उद्देशिकेचे वाचन केले.

या निमित्ताने “भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये” या विषयावर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अभय दातार यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या भाषणात डॉ. दातार यांनी भारतीय राज्यघटनेतील मूलभूत तत्वे, तिची वैशिष्ट्ये तसेच इतर देशांच्या राज्यघटनांशी तुलना करत भारतीय राज्यघटनेचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “भारतीय राज्यघटना ही सामाजिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन असून जगातील सर्वश्रेष्ठ घटनांपैकी एक आहे.”

cd8fb8dd 1522 4a5e a4c3 b80bb6bd2c00 Constitution Day celebrated : पीपल्स कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. अशोक सिद्धेवाड, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य प्रा. विलास वडजे, इंग्रजी विभागातील प्रा.आनंदा थोरात, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. स्वाती काटे, प्रा. सविता महाजन, ग्रंथपाल प्रा. संदीप गायकवाड उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. विजय कदम यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. विनोद चव्हाण यांनी केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments