Wednesday, May 27

Tag: at People’s College

Constitution Day celebrated : पीपल्स कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

Constitution Day celebrated : पीपल्स कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

नांदेड, करियर
नांदेड| भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त पीपल्स कॉलेज, नांदेड येथे संविधान दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. भारताच्या घटना परिषदेने अथक परिश्रमांनंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना अर्पण केली होती. या ऐतिहासिक घटनेला आज ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत. कार्यक्रमाची सुरुवात प्रभारी प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर यांच्या हस्ते राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून झाली. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे पूजन करण्यात आले व सर्व उपस्थितांनी सामूहिकरित्या संविधान उद्देशिकेचे वाचन केले. या निमित्ताने "भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये" या विषयावर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अभय दातार यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या भाषणात डॉ. दातार यांनी भारतीय राज्यघटनेतील मूलभूत तत्वे, तिची वैशिष्ट्ये तसेच इतर देशा...
error: Content is protected !!