HomeनांदेडKarthik Swami Darshan : वाढोण्याचा बालाजी मंदिरात कार्तिक स्वामी दर्शन समर्पण तयारी...

Karthik Swami Darshan : वाढोण्याचा बालाजी मंदिरात कार्तिक स्वामी दर्शन समर्पण तयारी पूर्ण -NNL

हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील मुर्त्यांची शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर (वाढोणा) शहरातील बालाजी मंदिरात विराजमान असलेल्या भगवान श्री कार्तिक स्वामी (षडानंद) दर्शन समापन दिनानिमित्त मंदिराच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावर्षी कार्तिक शु.१४ शुक्रवार दि.१५ नोव्हेंबर रोजी कार्तिक पोर्णिमा कृतिका नक्षत्र दिनी कार्तिक स्वामी दर्शन घेत येणार आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग हा रात्री १० ते ०२ यावेळेत आला असल्याची माहिती वेद शास्त्रीय संपन्न पुरोहित कांतागुरु वाळके यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.

हिमायतनगर शहर हे देवी – देवतांच्या मुर्त्यांचे शहर म्हणून सबंध महाराष्ट्रात ख्यातीप्राप्त आहे. हजारो वर्षापूर्वीच्या अखंड पाषाणातील दुर्मिळ मुर्त्या खोदकाम तथा बांधकामाच्या माध्यमातून समोर आल्या आहेत. त्यातीलच एक मूर्ती म्हणजे (षडानंद) कार्तिक स्वामीची असून, कार्तिक पौर्णिमेनिमित्त दर्शनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. हिमायतनगर (वाढोणा) येथील बालाजी मंदिरात असलेली मूर्ती अत्यंत रेखीव व देखणी असून, नांदेड जिल्ह्यात हि एकमेव मूर्ती मोरावर आरूढ झालेली आहे. सदर मूर्ती दर्शनसाठी विदर्भ, तेलंगाना, आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्रातील दूर दूरवरून भाविक – भक्त आवर्जून हजेरी लावून पुण्यपदरी पडून घेतात.

Kartik swami Karthik Swami Darshan : वाढोण्याचा बालाजी मंदिरात कार्तिक स्वामी दर्शन समर्पण तयारी पूर्ण -NNL

या जन्मी विद्या बुद्धी, धन ऐश्वर्य, पुत्र – पोत्र संपदा समर्पनेने सुख समृद्धी आगता… पुढील जन्म चांगला मिळण्यासाठी श्री कार्तिक स्वामीची सर्वांनी दर्शन घ्यावे असे आवाहन वेद शास्त्रीय संपन्न पुरोहित कांतागुरु वाळके यांनी केले आहे. दि.१५ रोजी सकाळी ४ वाजता येथील बालाजी मंदिरात विराजमान असलेल्या भगवान कार्तिक स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक महापूजा संपन्न होऊन प्रसाद वितरण केला जाणार आहे. त्यानंतर रात्रीला १० वाजेपासून ते मध्यरात्री ०२ वाजेपर्यंत भक्तांना कार्तिक स्वामीजींचे दर्शन घेण्याचा विशेष योग जुळून आला आहे. सांगितले जाते कि कार्तिक पौर्णिमेच्या मुहूर्तावर भगवान कार्तिकेय स्वामींचे दर्शन घेतल्याने घरात आनंदमय वातावरण निर्माण होऊन सुख समृद्धी नांदते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments