Wednesday, May 13

Tag: Inauguration

The thrill of Shankarpat : वाळकेवाडी येथे शंकरपट स्पर्धेचा थरार; आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते उद्घाटन

The thrill of Shankarpat : वाळकेवाडी येथे शंकरपट स्पर्धेचा थरार; आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते उद्घाटन

कृषी, नांदेड
हिमायतनगर (अनिल मादसवार) विदर्भ- मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण संस्कृतीचा आत्मा मानल्या जाणाऱ्या आणि सुमारे ३०० वर्षांची परंपरा लाभलेल्या शंकरपट (बैलगाडा शर्यत) स्पर्धा सध्या सर्वत्र उत्साहात साजऱ्या होत आहेत. हिमायतनगर तालुक्यातील दुधड वाळकेवाडी येथे श्री गुरु समर्थ रामबापू मेटकर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित यात्रा महोत्सवात दि. १ फेब्रुवारी रोजी भव्य शंकरपट स्पर्धेचे उद्घाटन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटनप्रसंगी पारंपरिक वाद्यांचा गजर, बैलजोड्यांची सजावट आणि ग्रामस्थांचा जल्लोष पाहायला मिळाला. विदर्भ व मराठवाड्यातील विविध भागांतून आलेल्या शेकडो स्पर्धकांनी आपल्या दमदार बैलजोड्यांसह सहभाग नोंदवत बैलांच्या वेगाची चित्तथरारक परंपरा पुन्हा एकदा जिवंत केली. हजारो नागरिकांनी ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थिती लावली होती. शंकरपट स्पर्धा ही क...
Baseball Sports Tournament : राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे उदघाटन; महाराष्ट्र संघाची विजयी सलामी

Baseball Sports Tournament : राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे उदघाटन; महाराष्ट्र संघाची विजयी सलामी

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| एकोणवीस वर्ष मुले मुली गटातील राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे (School Baseball Sports Tournament) बुधवारी सकाळी नांदेड येथील पिपल्स कॉलेजमध्ये शानदार उद्घाटन झाले. देशातील अनेक राज्यांच्या चमू या ठिकाणी सहभागी झाल्या असून क्रीडा प्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने सन 2024-25 या वर्षातील राष्ट्रीयस्तर शालेय बेसबॉल (19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि.14 ते 18 जानेवारी, 2025 या कालावधीत पिपल्स कॉलेज, नांदेड येथे करण्यात आले आहे. ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन दि.15 जानेवारी या राज्य क्रीडा दिनाचे औचीत्य साधून य...
CEO Meenal Karanwal : सीईओ मीनल करनवाल यांच्‍या हस्‍ते नांदेडमध्‍ये मिनी सरस विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन -nnl

CEO Meenal Karanwal : सीईओ मीनल करनवाल यांच्‍या हस्‍ते नांदेडमध्‍ये मिनी सरस विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन -nnl

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| नांदेड शहरात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोन्नती अभियानाच्या जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने भव्‍य मिनी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मीनल करनवाला यांच्‍या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांच्या संकल्पनेतून या मिनी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले आहे. यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्‍कावार, जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रविणकुमार घुले, नरेगाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, नियोजनचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे आदींची उपस्थिती होती. हे प्रदर्शन नांदेडच्या मल्टीपर्पज हायस्कूल, वजिराबाद येथे 6 जानेवारीपासून सुरू झाले असून, यत्‍या 10 जानेवारीपर्यंत सर्व नागरिकांसाठी मोफत खुले राहणार आह...
MLA Chikhlikar : माळेगाव यात्रेत निक्षय वाहनाचे आमदार चिखलीकर यांच्या हस्ते उद्घाटन -NNL

MLA Chikhlikar : माळेगाव यात्रेत निक्षय वाहनाचे आमदार चिखलीकर यांच्या हस्ते उद्घाटन -NNL

राजकीय, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यात 7 डिसेंबर 2024 ते 24 मार्च 2025 या कालावधीत शंभर दिवसीय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत क्षयरोग विभागातर्फे निक्षय वाहन म्हणजे एक फिरस्ती रुपी वाहन तयार करण्यात आले आहे. या निक्षय फिरत्या वाहनाचे उद्घाटन नुकतेच माळेगाव यात्रेत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले . या निक्षय वाहनाच्या माध्यमातून ट्रू नेट या उपकरणाद्वारे संशयित क्षय रुग्णांचे थुंकी नमुने तपासणे व रोग निदान करणे व यातून अति जोखीम रुग्णही शोधणे तसेच रुग्णांचे एक्स-रे काढून निदान करणे व निदान झालेल्या क्षय रुग्णांचे लगेच औषधोपचार चालू करणे असे नियोजन करण्यात आले आहे . सोबतच क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. या तपासण्या तज्ञ व्यक्तींच्या नियोजनातून होत आहेत. वाहनाच्या उदघाटन प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत ) मंजुषा जाधव कापसे ,जिल्हा आरोग्य अधिकारी ...
Inauguration of Pawansut Hanuman Temple : पवनसुत हनुमान मंदिर लोकार्पण, बजरंगबली, गणपती बाप्पा, शिवलिंग मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली थाटात  -NNL

Inauguration of Pawansut Hanuman Temple : पवनसुत हनुमान मंदिर लोकार्पण, बजरंगबली, गणपती बाप्पा, शिवलिंग मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली थाटात -NNL

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार| जय श्रीराम... बजरंग बली की जय...पवनसुत हनुमान कि जय... हर हर महादेव.... नामाचा जयघोष करत हजारो महिला पुरुष भाविकांच्या साक्षीने पुरोहिताच्या मंत्रोच्चार वाणीत पवनसुत हनुमान मंदिराचा लोकार्पण, बजरंगबली, गणपती बाप्पा तसेच शिवलिंग मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा दिनांक १६ सोमवारच्या शुभमुहूर्तावर थाटात संपन्न झाला. यावेळी वसमत येथील थोरला मठाचे मठाधिपती श्री ष. ब्र. 108 वेदांताचार्य दिगंबर स्वामी शिवाचार्य महाराज यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. हिमायतनगर (वाढोणा) शहरातील प्रसिद्ध असलेल्या बजरंग चौक परिसरातील पवनसुत हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार करण्यासाठी येथील युवकांनी साकडे घातल्यानंतर माजी खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी मंदिराच्या बांधकामासाठी २० लक्ष रुपयाचा निधी दिला होता. यातून मंदिराचा जीर्णोद्धार होऊन कायापालट करण्यात आला. तसेच मंदिरातील टाइल्स आणि इतर...
Vishwashanti Buddha Vihara : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विश्वशांती बुद्ध विहाराचे लोकार्पण -NNL

Vishwashanti Buddha Vihara : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विश्वशांती बुद्ध विहाराचे लोकार्पण -NNL

नांदेड, महाराष्ट्र, लातूर
लातूर/ उदगीर| लातूर येथील तळवेस परिसरातील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, सर्वश्री आमदार विक्रम काळे, रमेश कराड, अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण, फीत कापून विहाराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी विहारातील गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या...
अनाथ मुलांना व सुरक्षा रक्षकांना छत्र्या वाटप करून कृपाछत्र उपक्रमांचा शुभारंभ -NNL

अनाथ मुलांना व सुरक्षा रक्षकांना छत्र्या वाटप करून कृपाछत्र उपक्रमांचा शुभारंभ -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। लहुजी साळवे बालकाश्रम धनगरवाडी आणि इंटेलिजन्स सेक्युरिटी सर्विसेस हनुमान पेठ नांदेड येथे भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून, याप्रसंगी अनाथ मुलांना व सुरक्षा रक्षकांना छत्र्या वाटप करून कृपाछत्र उपक्रमांचा शुभारंभ करून आगळ्या वेगळ्या प्रकारे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून अनाथाश्रम आणि इंटेलिजन्स सेक्युरिटी सर्विसेस येथे ॲड.ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते.अनाथ मुलांना मदत म्हणून दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून भाजप महानगर नांदेड तसेच लायन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या तर्फे लहुजी साळवे बालकाश्रम येथे विविध उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हैदराबाद येथील सुप्रसिध्द समाजसेविका स्नेहलता जयस्वाल यांनी भूषविले. याप्रसंगी भाजपा कामगार आघाडीचे...
Vanchit Bahujan Alliance | नंदगावमध्ये वंचित बहुजन आघाडी शाखा उदघाटन व नामफलक अनावरण – NNL

Vanchit Bahujan Alliance | नंदगावमध्ये वंचित बहुजन आघाडी शाखा उदघाटन व नामफलक अनावरण – NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| आज दिनांक ईस्लापुर पासून जवळचं असलेल्या नंदगाव येथ निखिल वागमरे जगदीश हनवते गौरव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन करण्यात आली. या शाखेचे उद्घाटन वंचितचे किनवट तालुका अध्यक्ष निखिल वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शाखा अध्यक्ष म्हणून संदीप लव्हाळे, उपाध्यक्ष चांगदेव भडंगे/यशवंतराव टारपे, सचिव देविदास भडंगे, सहसचिव दत्तात्रय डुकरे, कोषाध्यक्ष सोमनाथ टारपे , संघटक लक्ष्मण लव्हाळे, सहसंघटक शिवाजी टारपे आणि सल्लागार विशाल लव्हाळे आदींची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रवीण दादा गायकवाड , दिनेश कांबळे ,खंडेराय कांबळे, भारत लव्हाळे, बाबू भंडगे, प्रकाश भडंगे, विनोदबोड्डेवार,परमेश्वर गायकवाड, शंक बोड्डेवार यांच्यासह अनेक महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते...
error: Content is protected !!