Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Wazirabad ; मनपा क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त पदी राजेश जाधव तर वजिराबाद क्षेत्रीय कार्यालय गौतम कवडे यांच्यी नियुक्ती – NNL

Wazirabad ; मनपा क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त पदी राजेश जाधव तर वजिराबाद क्षेत्रीय कार्यालय गौतम कवडे यांच्यी नियुक्ती – NNL

नांदेड, करियर
नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय अशोकनगर नांदेडच्या सहाय्यक आयुक्त पदी राजेश जाधव यांच्यी तर वजीराबाद क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्तपदी गौतम कवडे यांच्यी नियुक्ती मनपा आयुक्त डॉ.महेश‌ कुमार डोईफोडे यांनी एका आदेशाव्दारे केली असून या नियुक्ती बदल क्षेत्रीय कार्यालय कर्मचारी व मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे. नांदेड वाघाळा महानगरपालिका आयुक्त डॉ.महेश‌ कुमार डोईफोडे यांनी 2 डिसेंबर रोजी काढलेल्या एका आदेशाव्दारे क्षेत्रीय कार्यालय अशोकनगरचे सहाय्यक आयुक्त डॉ. मिर्झा बेग यांच्या ठिकाणी सहाय्यक आयुक्त म्हणून राजेश जाधव यांच्यी नियुक्ती केली आहे तर वजीराबाद क्षेत्रीय कार्यालय येथे उपायुक्त संजय जाधव यांच्या कडे असलेला पदभार गौतम कवडे यांना देण्यात आला असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. सहाय्यक आयुक्त म्हणून राजेश जाधव व गौतम कवडे यांच्या नियुक्ती बद्दल कार्यालयी...
sub-inspector ; ग्रामीण पोलीस स्टेशन येथील तीन जणांना उपनिरीक्षक पदी पदोन्नती – NNL

sub-inspector ; ग्रामीण पोलीस स्टेशन येथील तीन जणांना उपनिरीक्षक पदी पदोन्नती – NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड l ग्रामीण पोलीस स्टेशन येथील तीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी कार्यरत असलेले शेख शादुल शेख लाल ,मधुकर शिंदे,परमेश्वर कदम यांच्यी उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाल्या बदल पोलिस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक व पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या हस्ते स्टार लावून सत्कार करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी 27 नोव्हेंबर 24 रोजी काढलेल्या आदेशानुसार नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथील तीन जणांना उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे. परमेश्वर कदम यांच्या स्टार लावून पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक व पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कर्मचारी स्टाफ यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले....
School without an office : दफ्तरविना शाळा : पर्यावरणाच्या सानिध्यात ज्ञान विज्ञानाचा अभ्यास वनभोजनातून चिमुकल्यांनी घेतला निसर्गशाळेचा आनंद -NNL

School without an office : दफ्तरविना शाळा : पर्यावरणाच्या सानिध्यात ज्ञान विज्ञानाचा अभ्यास वनभोजनातून चिमुकल्यांनी घेतला निसर्गशाळेचा आनंद -NNL

करियर, नांदेड
नांदेड| 'बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु झाडे, वेली, पशू-पाखरे यांच्या गोष्टी करु' या गदिमांच्या निसर्ग कवितेप्रमाणे विविध शालेय उपक्रमासोबतच वनभोजन या सहशालेय उपक्रमाचे शाळांकडून आयोजन केल्या जाते. चार भिंतीच्या आतील बंदिस्त अभ्यासक्रम एकदिवस टाळून निसर्गाच्या सानिध्यात विविध प्रकारची पिके, झाडे, पशु, पक्षी, वेली यांच्याशी गुजगोष्टी करीत अनेक अनुभवांची समृद्धी हस्तगत करुन घेण्यासाठी निसर्ग शाळा हा उपक्रम घेण्यात येतो. या अंतर्गत दफ्तरविना शाळेचे आयोजन करुन विविध अध्ययन अनुभव देता येतात. पर्यावरणाशी सन्निकटता साधत आणि त्या माध्यमातून ज्ञान विज्ञानाचा अभ्यास करीत जवळा दे. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी वनभोजन या कार्यक्रमातून निसर्ग शाळेचा मनमुराद आनंद घेतला. मोकळ्या रानी आणि उघड्या आभाळी मुलांनी गप्पा, गोष्टी, शालेय कविता, गाणी, स्वरचित कविता, मिमीक्री...
Dr. Baban Jogdand : यशदातील अधिकारी डॉ.बबन जोगदंड यांना दुसऱ्यांदा पीएचडी आतापर्यंत मिळवल्या २५ पदव्या व पदविका -NNL

Dr. Baban Jogdand : यशदातील अधिकारी डॉ.बबन जोगदंड यांना दुसऱ्यांदा पीएचडी आतापर्यंत मिळवल्या २५ पदव्या व पदविका -NNL

करियर, नांदेड
नांदेड/पुणे| नांदेडचे भूमिपुत्र तथा यशदा पुणे येथील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांनी दुसऱ्यांदा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा नांदेड या विद्यापीठाची 'लोकप्रशासन' या विषयात एचडी पदवी प्राप्त केली आहे. डॉ. बबन जोगदंड यांनी शिक्षण क्षेत्रात राज्यात विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी राज्यातील कार्यरत अधिकारी वर्गात सर्वाधिक पदव्या, पदविका मिळवण्याचा मान मिळवला आहे. आतापर्यंत त्यांनी २५ विषयात पदवी, पदविका मिळवल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी ६ विषयात एम.ए. केले आहे. त्याचबरोबर एलएलबी, एमबीए, एम.एस्स.सी.(मानसशास्त्र), एम.एम.सी.जे. मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम अशा महत्त्वपूर्ण पदव्या प्राप्त केल्या आहेत. देगलूर महाविद्यालय देगलूर येथील लोकप्रशासन केंद्राचे विभाग प्रमुख संशोधक डॉ. बालाजी कत्तुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली 'लोकप्रशासन' या विषयात 'महाराष्ट्राच्या लोकप्रशासनात यशदाचे योगदान' या विषयात...

District level youth festival started with enthusiasm : जिल्हास्तरीय युवा महोत्सवास उत्साहात सुरुवात -NNL

करियर, नांदेड
नांदेड| क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठ व युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 01-02 डिसेंबर,2024 या कालावधीत मंच क्रं.01- जिल्हा क्रीडा संकुल, बास्केटबॉल मैदान, नांदेड, मंच क्रं. 02- डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडियम परिसर, नांदेड व मंच क्रं.03- जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड, या ठिकाणी करण्यात आले. या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उदघाटन आज 01 डिसेंबर,2024 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती सान्वी जेठवाणी (राज्य निवडणुक दुत,भारत सरकार), श्रीमती चंदा रावळकर (युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, नांदेड), मा.श्रीमती कविता जोशी (जिल्हा ...
Swara Ghajulwad : स्वरा गाजुलवाड हिचा राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत तृतीय -NNL

Swara Ghajulwad : स्वरा गाजुलवाड हिचा राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत तृतीय -NNL

करियर, नांदेड, सोशल वर्क
नांदेड़| कु. स्वरा राजेश गाजुलवाड हीने धुळे येथे झालेल्या14 वर्षे खालील वयोगटातुन राज्यस्तरावरील कराटे स्पर्धामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केलेलाअसून तिने मिळविलेल्या या यशा बदल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. कु. स्वरा राजेश गाजुलवाड हीने प्रथम जिल्हा पातळीवरील कराटे स्पर्धामध्ये विजय संपादन करुन दि 25 नोंव्हेबर 2024 रोजी नांदेड येथील स्टेडीयम झालेल्या विभागीय स्पर्धामध्ये यश संपादन करुन लातूर विभागातून तीची 14 वर्षाखालील वयोगटामध्ये राज्यस्तरावरील कराटे स्पर्धामध्ये निवड झालेली होती. दिनांक 29 नोंव्हेबर 2024 रोजी धुळे येथे राज्यस्तरावरील कराटे स्पर्धामध्ये तीच्या 14 वर्षाखालील वयोगटामध्ये तृतीय क्रमांक मिळवून राज्य शासनाकडून खेळाडूंना असणा-या 5 टक्के राखीव जागेच्या लाभाचे प्रमाणपत्र प्राप्त केले. या यशाबदल तीचे व कराटे किडस क्लब नांदेडचे प्रशिक्षक आकाश भोरे यांचे अभिनंदन होत आहे...
Dr. Baban Jogdand ; विद्यार्थ्यांनीमोठं होण्यासाठी मोठी स्वप्न पहावी यशदाचे अधिकारी – डॉ. बबन जोगदंड – NNL

Dr. Baban Jogdand ; विद्यार्थ्यांनीमोठं होण्यासाठी मोठी स्वप्न पहावी यशदाचे अधिकारी – डॉ. बबन जोगदंड – NNL

नांदेड, करियर
लोहा l जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहावीत, त्याचबरोबर संवाद कौशल्य ,इंग्रजी भाषा, तंत्रज्ञान, आत्मविश्वास आणि कष्ट ही पंचसूत्री जीवनामध्ये अंगीकारावी, असे आवाहान यशदा पुणे येथील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांनी केले. लोहा येथील 'जिज्ञासा' अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणात ते बोलत होते .या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षा अभियानाचे सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास ढवळे, नांदेड जिल्हा परिषदचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना डॉ. बबन जोगदंड यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मनन, चिंतन, लेखन,वाचन, सराव या गोष्टी कराव्यात .बोलण्याचे कौशल्य आत्मसात करावे व इंग्रजी भाषा समृद्ध करावी असे आवाहनही त्यांनी केले. जीवनामध्ये यश मिळवण्यास...
Cyber ​​Police : सायबर पोलीसातर्फे विदयार्थ्यासाठी सायबर जनजागृती कार्यशाळा संपन्न -NNL

Cyber ​​Police : सायबर पोलीसातर्फे विदयार्थ्यासाठी सायबर जनजागृती कार्यशाळा संपन्न -NNL

करियर, नांदेड
नांदेड| सायबर पोलीस स्टेशन नांदेड यांच्या वतीने प्रतीभा निकेतन विदयालय श्रीनगर, नांदेड येथे विदयार्थ्यासाठी सायबर जनजागृती कार्यशाळा संपन्न झाली. यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिनांक 29/11/2024 रोजी विदयार्थ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेला मोबाईलचा व सोशल मिडीयाचा वापर त्याचे दुष्परीनाम, ऑनलाईन फसवणूक, विविध प्रकारचे सायबर गुन्हे, माहिती तंत्रज्ञान अधिनियम, सायबरचा वापर करताना घ्यावयाची दक्षता व सुरक्षा, एखादा सायबर गुन्हा घडल्यास त्याबाबत कुठे तक्रार करावी या बाबतीत विदयार्थी व शिक्षक यांचेमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलीस अधीक्षक साहेब, अबिनाश कुमार व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, धिरज चव्हाण पो.स्टे. सायबर, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक मारोती चव्हाण, पोकॉ/ काशीनाथ कारखेडे यांनी उपस्थीत शिक्षकवृंद व विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. सदर कार्यशाळेल...
Rahul Shankarao ; अल्प भूधारक शेतकऱ्याचा मूलगा झाला प्रथम श्रेणी अधिकारी’ : राहुल शंकरराव महामुने यांचे एमपीएससीत यश – NNL

Rahul Shankarao ; अल्प भूधारक शेतकऱ्याचा मूलगा झाला प्रथम श्रेणी अधिकारी’ : राहुल शंकरराव महामुने यांचे एमपीएससीत यश – NNL

करियर, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे l पाणी टंचाईग्रस्त पाचोंदा गावातील अल्प भूधारक शेतकऱ्याचा मुलगा राहुल शंकरराव महामुने यांनी मोठ्या परिश्रम व जिद्दीने अभ्यास करून एमपीएससी परिक्षेत उज्ज्वल यश मिळवून " 'प्रथम श्रेणीअधिकारी 'अ' पदाला गवसनी घातल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. अतिदूर्गम पाचोंदा येथील अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्य रमाबाई व शंकरराव महामुने यांनी आपल्या मुलांना शिक्षणाचं बाळकडू पाजलं. शिक्षणावर भर देवून त्यांनी तिन्ही मुलं शिक्षक केली. त्यांचा मोठा मूलगा अनिल महामुने हे शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी असा प्रवास करत, माजी गट शिक्षणाधिकारी व पीएम पोषण आहार शक्ती निर्माण योजना अधिक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांचा दुसरा मुलगाही शिक्षक आहे. राहूल महामुने हा त्यांचा धाकटा मुलगा. राहूलचे प्राथमिक शिक्षण पाचोंदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर गोकुंदा येथील महात्मा ज्य...
Shivaji Vidyalaya ; विभागीय क्रिडा स्पर्धेत शिवाजी विद्यालय सिडकोचे यश – NNL

Shivaji Vidyalaya ; विभागीय क्रिडा स्पर्धेत शिवाजी विद्यालय सिडकोचे यश – NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड l जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२४-२०२५ अंतर्गत आयोजित मार्शल आर्ट कराटे या स्पर्धेत १४ ते १७ या वयोगटातून जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी, संचलित शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय सिडको नांदेड या शाळेची विद्यार्थीनी माननी क्षीरसागर व सृष्टी मोतेवार यां विद्यार्थीनींना थांगता मार्शल आर्ट या खेळामध्ये स्टेट लेव्हल सिल्वर मेडल तर कराटे या खेळात सृष्टी मोतेवार या विद्यार्थीनीने गोल्ड मेडल तर मानीनी क्षिरसागर या विद्यार्थीनीने सिल्व्हर मेडल मिळविले. (more…)...
error: Content is protected !!