HomeनांदेडNewspaper vendors ; वृत्तपत्र विक्रेता दिन व जिल्हा संघटनेचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त...

Newspaper vendors ; वृत्तपत्र विक्रेता दिन व जिल्हा संघटनेचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम -NNL

नांदेड। महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेशी सलग्न असलेल्या नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचा पंचवीसावा वर्धापन दिन व भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या निमित्ताने 15 आक्टोबर रोजी जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संघटनेचा हा वर्धापनदिन रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन असल्याने विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात येणार आहे.

मेळाव्यात वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सायकल स्पर्धा, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांसाठी जनरल नाॅलेज स्पर्धा, पेपर वाटप कारणांसाठी पेपर फेकण्याची नेमबाजी स्पर्धा, गुणवंत पाल्यांचा सत्कार,जेष्ठ विक्रेत्यांचा सत्कार, आजपर्यंत संघटनेला विशेष सहकार्य केलेल्यांचा प्रतिनिधिक सत्कार, तसेच व्यवस्थापनातील वितरण प्रतिनिधिंचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हा संघटनेच्या वतीने देण्यात येणारा सन्मानाचा दिवंगत कामगार नेते अनंतराव नागपूरकर उत्कृष्ट पत्रकारिता व उत्कृष्ट वृत्तपत्र विक्रेता संघटक राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पुरस्कारांचे स्वरूप मानपत्र ,सन्मान चिन्ह,रोख रक्कम असे असते.

तसेच सायकल स्पर्धा व जनरल नाॅलेज स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या जिल्हा मेळाव्यात मराठवाड्यातील तसेच जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी व विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.तसेच या मेळाव्यासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे प्रमुख म्हणून राज्य कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत घाटोळ तर सचिव म्हणून गणेश वडगावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

तसेच समितीचे उपप्रमुख बालाजी चंदेल, कोषाध्यक्ष बाबु जल्देवार, सहकोषाध्यक्ष कयुमखान पठाण, प्रसिध्दी प्रमुख भागवत गायकवाड तर सदस्य म्हणून गणेश जुजाराव, सतिश कदम सिडको,बालाजी सुताडे सिडको,अनुप ठाकुर,रामेश्वर पवार, लख्खन नरवाडे, संदिप कटकमवार, विठ्ठल फडेवार, विनायक आंधे,देवबा डोरले (तामसा) , सुनिल व्यवहारे (हदगाव) ,अनंत संगेवार (मुखेड) , हबीब उबेद (देगलुर ),बापुराव बडुरे (बरबडा) , अशोक खुने,आवधुत पसलवाड तर जेष्ठ सल्लागारपदी सरदारसिंह चौहान, शंकर हुस्से, अनिल मेडेवार हे आहेत.

हा रौप्यमहोत्सवी वृत्तपत्र विक्रेता मेळावा यशस्वी करण्यासाठी संयोजन समिती कामाला लागलेली आहे. तसेच या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेता बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष बालाजी पवार यांनी दिली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments