नवीन नांदेड l मनपाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोक अदालत मध्ये सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत लोक अदालत जवळपास २०० थकीत मालमत्ता धारकांनी सहभागी होत.
रोख व धनादेशव्दारे ५० लाख ७० हजार २१० रूपये जमा केले असून यासाठी कर निरीक्षक,वसुली लिपीक यांनी सहकार्य केले. नावामनपाचा वतीने आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे ,अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मालमत्ता विभाग अजीतपाल सिंग संधु,यांच्या आदेशानुसार सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या थकीत मालमत्ता धारकांसाठी मनपाने राष्ट्रीय लोक अदालत २८ सप्टेंबर रोजी मुख्यालय मनपा येथे आयोजन करण्यात आले होते.
थकीत असलेल्या जवळपास जवळपास २४०० मालमत्ता धारकांना सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड,कार्यालय अधिक्षक विलास गजभारे यांच्या सहकार्याने कर निरीक्षक संजय नागापूरकर,मारोती सारंग, प्रकाश दर्शने, यांच्या माध्यमातून विवेकानंद लोखंडे,महेद्रं पठाडे,रमेश यशवंतकर, रविंद्र पवळे,सुधीर कांबळे,नरसिंग कुलकर्णी,दिपक जौधंळे,राहुल पाईकराव यांच्या मार्फत प्रभाग क्रमांक १९ व २० मधील जवळपास २४०० मालमत्ता धारकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या, २८ सप्टेंबर आयोजित राष्ट्रीय लोक अदालत मध्ये मालमत्ता धारकांना थकीत शास्तीवर ८०/ टक्के सुट देण्यात आली होती.
यावेळी परिसरातील जवळपास २०० मालमत्ता धारकांनी सहभागी होऊन रोख व धनादेश व्दारे ५० लाख ७० हजार रुपये कर भरणा केला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड व कर निरीक्षक संजय नागापूरकर यांनी दिली असून सिडको क्षेत्रीय कार्यालय पथकाला उपायुक्त अजितपाल सिंग संधू यांनी मार्गदर्शन करून योग्य त्त्या सुचना वेळोवेळी दिल्या.