CIDCO regional office in Municipal National Lok Adalat ; मनपाच्या राष्ट्रीय लोक अदलात मध्ये सिडको क्षेत्रीय कार्यालयाची ५० लाख वसुली, थकीत २०० मालमत्ता धारक सहभाग – NNL
नवीन नांदेड l मनपाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोक अदालत मध्ये सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत लोक अदालत जवळपास २०० थकीत मालमत्ता धारकांनी सहभागी होत.
रोख व धनादेशव्दारे ५० लाख ७० हजार २१० रूपये जमा केले असून यासाठी कर निरीक्षक,वसुली लिपीक यांनी सहकार्य केले. नावामनपाचा वतीने आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे ,अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मालमत्ता विभाग अजीतपाल सिंग संधु,यांच्या आदेशानुसार सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या थकीत मालमत्ता धारकांसाठी मनपाने राष्ट्रीय लोक अदालत २८ सप्टेंबर रोजी मुख्यालय मनपा येथे आयोजन करण्यात आले होते.
थकीत असलेल्या जवळपास जवळपास २४०० मालमत्ता धारकांना सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड,कार्यालय अधिक्षक विलास गजभारे यांच्या सहकार्याने कर निरीक्षक संजय नागापूरकर,मारोती सारंग, प्रकाश दर्शने, यांच्या माध्यमातून विवेकानंद लोखं...
