नांदेड/हदगाव। महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष व हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील इच्छुक महिला उमेदवार तथा प्रबळ दावेदार डॉ. रेखाताई पा. चव्हाण गोर्लेगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे शुभारंभ दि. 28 रोजी थाटात संपन्न झाला. यावेळी मोठया प्रमाणावर शिक्षक बांधव आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार आणि पक्षाने संधी दिल्यास आगामी हदगाव हिमायतनगर मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी तयारी करत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.



हदगाव येथील तहसील कार्यालयासमोर काँग्रेसच्या प्रबळ दावेदार तथा भावी आमदार डॉ. रेखाताई चव्हाण पाटील गोर्लेगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन हिंगोली लोकसभा खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र तथा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा पाटील अष्टीकर, आणि प्रसिद्ध रीलस्टार कल्पना खानसोळे यांच्या उपस्थितीत थाटात करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बिंदू महाविद्यालय भोकरचे प्राचार्य डॉ. पंजाबराव चव्हाण, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सदस्य, प्रा. राजेश फुलारी, शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष वसंतराव देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती हिमायतनगरचे माजी सभापती दत्तराम पाटील करंजीकर, प्रभाकर अण्णा मुधोळकर, अन्वर खान पठाण, हनीफ सर, सदाशिव सातव, असलम पठाण भांडेवाले, फेरोज कुरेशी, मिरझा नुहीबेग, निवघा येथील माजी सरपंच भास्करराव पाटील, नेवरी येथील कैलास शिंदे, कल्याणकर, जाधव, शिंदे, माणिक कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.



यावेळी हदगाव हिमायतनगर विधानसभा क्षेत्रात गणेशोत्सवानिमित्त हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील गणेश मंडळ व गणेश भक्तांसाठी “सुंदर माझा बाप्पा” या स्पर्धेचे आयोजन विशेषतः तरुण युवकांसाठी करण्यात आले होते. या स्पर्धेत आपली गणराया विषयी असणारी आस्था आणि कला दाखवण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. रेखाताई पा. चव्हाण गोर्लेगावकर यांनी उपलब्ध करून दिली होती. या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.


“सुंदर माझा बाप्पा” या स्पर्धेचे बक्षिस वितरण सोहळा थाटात संपन्न झाला. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक हे तब्बल 51 हजार रुपये होते, हदगाव येथील जय महाराष्ट्र गणेश मंडळ, यशवंत नगर यांनी पटकावले तर द्वितीय पारितोषिक 21 हजार होते ते मातोश्री युवा गणेश मंडळ, मौजे धानोरा माऊली आणि तृतीय पारितोषिक हे 15 हजार रुपयांचे इंद्रधनुष्य बाल गणेश मंडळ, धानोरा माऊली आणि उत्तेजनार्थ 11 हजार रुपयाचे बक्षीस फार्मसी वाले गणेश मंडळ, बाभळी व 7 हजार रुपयाचे बक्षीस शिवशंभू बाल गणेश मंडळ, वायपना बुद्रुक यांनी देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्वच गणेश मंडळ आणि स्पर्धकांचे प्रमाणपत्र आणि भेट वस्तू देऊन उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


या बक्षिस वितरण सोहळ्यातच दोन्ही तालुक्यातील विद्यार्थी घडवण्याचं कार्य करणारे गुरुवर्य यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सुमन सभागृहात सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला हदगाव हिमायतनगर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन जाधव यांनी केले तर प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. रेखाताई पा. चव्हाण गोर्लेगावकर यांनी केले.

