Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

MPSC exam on 1st December at 33 centers in Nanded : नांदेडमधील 33 केंद्रांवर 1 डिसेंबरला एमपीएससी परीक्षा – NNL

MPSC exam on 1st December at 33 centers in Nanded : नांदेडमधील 33 केंद्रांवर 1 डिसेंबरला एमपीएससी परीक्षा – NNL

करियर, नांदेड
नांदेड| राज्य शासनाने नोकर भरती मोठ्याप्रमाणात सुरू केली असून याअंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 ही येत्या 1 डिसेंबरला होणार आहे. नांदेडमधील सर्व प्रमुख शाळा व महाविद्यालयांमध्ये या परीक्षेचे केंद्र असून परीक्षेसंदर्भात असणारी नाकाबंदी व शंभर मिटर पर्यंत प्रवेश बंदी केली जाणार आहे. नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या महत्त्वपूर्ण परीक्षेला लक्षात घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते 5 याकालावधीमध्ये दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे रविवारी सेंटर असलेल्या शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात कोलाहल असणार नाही. कुठेही डिजे वाजणार नाही. किंवा शंभर मिटर पर्यंत मोबाईलपासून सर्व प्रकारच्या साहित्याला परिक्षा केंद्राच्या परिसरात वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम ...
Constitution Day : संविधान दिनानिमित्त नांदुसा जिल्हा परिषद शाळेत विशेष कार्यक्रम -NNL

Constitution Day : संविधान दिनानिमित्त नांदुसा जिल्हा परिषद शाळेत विशेष कार्यक्रम -NNL

करियर, नांदेड
नांदेड| भारतीय संविधान दिनाचा कार्यक्रम नांदेड तालुक्यातील नांदुसा येथील जिल्हा परिषद शाळेत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. मीनल करनवाल यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या भाषणांना प्रोत्साहन दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करत त्यांचे भविष्य, आवडीनिवडी आणि उद्दिष्टांबाबत प्रश्न विचारले. त्यांनी भारतीय संविधानाचे महत्व समजावून सांगताना, संविधानाच्या निर्मितीमागील प्रक्रिया, घटनेतील सदस्यांची माहिती आणि त्यातील वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. यावेळी इयत्ता तिसरीतील रुद्रमल्हार जनकवाडे याने डॉ. ...
Chief Executive Officer Meenal Karanwal : विद्यार्थी गुणवत्‍ता विकासावर भर द्यावा- मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

Chief Executive Officer Meenal Karanwal : विद्यार्थी गुणवत्‍ता विकासावर भर द्यावा- मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

नांदेड, करियर
नांदेड| शालेय शैक्षणिक गुणवत्ता विकास आणि आगामी शिक्षक बदली प्रक्रिया या संदर्भाने मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आज सर्व गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन विचारविनिमय केला. यावेळी त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता विकासाच्या कार्यक्रमावर भर देण्याचे आवाहन केले. तसेच दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करून बदली मागणाऱ्यांची रँडम तपासणी करून दोषी आढळण्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर समाधानकारक नसून मुलांना लिहिता वाचता आले पाहिजे. गणिती क्रिया इयत्ता नुसार करता आल्या पाहिजेत. यासाठी शिक्षकांनी शाळा स्तरावर मोठ्या प्रमाणावर काम करणे गरजेचे आहे. तसेच पर्यवेक्षकीय यंत्रणेने याकडे अत्यंत बारकाईने लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगून यावेळी त्‍यांनी गटशिक्षणाधिका-यांचा आढावा घेतला. आपल्या तालुक्यातील शैक्षणिक स्तर उंचावण्या...
Community reading : हुजपा मध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदाहिक वाचन -NNL

Community reading : हुजपा मध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदाहिक वाचन -NNL

नांदेड, करियर
हिमायतनगर| येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने संविधान दिनानिमित्त संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन घेण्यात आले. या प्रसंगी राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख व कार्यक्रमाचे संयोजक डॉ. एल. बी. डोंगरे यांनी भारतीय संविधानाचे प्रास्ताविकेच्या माध्यमातून महत्त्व पटवून देत असतांना म्हणाले की, आपल्या संविधानाने भारत देश अखंडित राहिला. कारण घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जात, धर्म, वंश, व भाषा अशा विविधतेने नटलेल्या देशाला एकसंध ठेवण्याचे काम भारतीय संविधानातुन केले आहे. आज आपल्या देशाला संविधान स्वीकारून 75 वर्षे पूर्ण झालेले आहेत. तरीही आजतागायत संविधानानुसार या देशाचा राज्यकारभार चालताना आपणास दिसून येतो आहे. संविधानामुळे आपल्या देशामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, आणि न्याय निर्माण होण्यास मदत झाली. म्हणून संविधान हे समाज परिवर्तनाचे प्रभावी सा...
Class 12th and 10th Exam Schedule Announced : बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर -NNL

Class 12th and 10th Exam Schedule Announced : बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर -NNL

करियर, नांदेड, मुंबई
मुंबई| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी - मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक मंडळामार्फत www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाल यांनी दिल्याचे मुंबई विभागीय सचिव ज्योत्स्ना शिंदे - पवार यांनी कळविले आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण, द्विलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा) मंगळवार दिनांक ११ फेब्रुवारी ते मंगळवार दिनांक १८ मार्च २०२५ या कालावधीमध्ये घेण्यात येतील. तर, प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक...
Youth festival organized on 1st and 2nd December : जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या तारखेत बदल; युवा महोत्सवाचे आयोजन 1 व 2 डिसेंबर 2024 -NNL

Youth festival organized on 1st and 2nd December : जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या तारखेत बदल; युवा महोत्सवाचे आयोजन 1 व 2 डिसेंबर 2024 -NNL

नांदेड, करियर
नांदेड| जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन 27 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, बास्केटबॉल मैदान नांदेड, कुसुम सभागृह नांदेड व डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडियम व श्री. गुरुगोबिंदसिंघजी स्टेडियम नांदेड या विविध ठिकाणी करण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यात राज्यस्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतीना सहभागी होता यावे व त्यांना सरावासाठी पुरेसा वेळ मिळावा या हेतुने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 1 व 2 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्त जास्त युवक-युवतीनी मोठया संख्येने सहभागी होता यावे, यामध्ये कृषी महाविद्यालये, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, अभियांत्रिकी, वैद्यकीय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महिला मंडळ, महिला बचतगट, युवकांसाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, नेहरु युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना (NS...
Maharashtra Public Service Commission : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर -NNL

Maharashtra Public Service Commission : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर -NNL

करियर, मुंबई
मुंबई| महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या विविध संवर्गांच्या पदांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दिनांक २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२४ या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबई येथील सीबीडी बेलापूर कार्यालयात या मुलाखती घेण्यात येतील. तालुका क्रीडा अधिकारी - तालुका क्रीडा अधिकारी संवर्गाच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आलेल्या चाळणी छाननीअंती मुलाखतीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक ५ व ६ डिसेंबर, २०२४ रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत. इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब - इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी संवर्गाच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आलेल्या छाननीअंती मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक २८ नोव्हेंबर, २०२४ तसेच दिनांक ३ व ४ डिसेंबर, २०२४ य...
Voting ; निर्मिती नर्सिंग कॉलेज व गुरूकुल स्कूलतर्फे मतदानाचा जागर 87 नांदेड दक्षिण स्वीप कक्षाचा उपक्रम – NNL

Voting ; निर्मिती नर्सिंग कॉलेज व गुरूकुल स्कूलतर्फे मतदानाचा जागर 87 नांदेड दक्षिण स्वीप कक्षाचा उपक्रम – NNL

नांदेड, करियर
नांदेड l निर्मिती नर्सिंग कॉलेज तसेच गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने 87 नांदेड दक्षिण स्वीप कक्षातर्फे मतदानाचा जागर उपक्रम आज राबविण्यात आला. नांदेड दक्षिण विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व नांदेड लोकसभा पोट निवडणूकीसाठी स्विप कक्षामार्फत आज गुरुकुल इंग्लिश स्कूल वजीराबाद येथे मतदान जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाचा आशा वर्कर्स, अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस यांना लाभ झाला. निर्मिती नर्सिंग स्कुल ,नांदेड, मुक्ता साळवे बहुउद्देशिय सामाजिक संस्था नांदेड, तसेच गुरूकुल ईंग्लीश मिडियम स्कूल ,वजिराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी स्वीप कक्षाच्या कविता जोशी यांनी सर्वांना मतदानाची शपथ दिली. या कार्यक्रमासाठी निर्मिती नर्सिंग स्कूलच्या सौ.उज्वला भावसार, नितिका बेंद्रे,अरुणा लामतुरे, उमा मद्दे, गुरूकुलच्या संचालिका वैशाली कुलकर...
National Legal Services Authority : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी न्यायमुर्ती भूषण गवई -NNL

National Legal Services Authority : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी न्यायमुर्ती भूषण गवई -NNL

नांदेड, करियर
नांदेड| राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमुर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश डी.एम. जज यांनी दिली. मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमुर्ती भूषण गवई यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच दिले आहे, तसे राजपत्र देखील प्रसिध्द करण्यात आले आहे. विधी सेवा प्राधिकरण कायदा, 1987 चे कलम 3 च्या 1 उपकलम (2) खंड (बी) द्वारे असलेल्या अधिकारानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. पुर्वीचे कार्यकारी अध्यक्ष, संजीव खन्ना यांची सरन्यायाधीश पदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या रिक्त जागेसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. नियमानुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या दुसऱ्या ज्येष्ठ न्यायमुर्तीच...
Eklavya Model Residential School : ओरिसा भुनेश्वर येथील राष्ट्रीय कला उत्सवात एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल सहस्त्रकुंडच्या सिद्धांत आणि पूजाने मारली बाजी -NNL

Eklavya Model Residential School : ओरिसा भुनेश्वर येथील राष्ट्रीय कला उत्सवात एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल सहस्त्रकुंडच्या सिद्धांत आणि पूजाने मारली बाजी -NNL

नांदेड, करियर
किनवट, परमेश्वर पेशवे| एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल सहस्त्रकुंड च्या सिद्धांत दत्ता लोखंडे इयत्ता दहावी व पूजा केशव बेले इयत्ता नववी यांनी नुकत्याच दिनांक १० नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान ओरिसा भुनेश्वर येथे आयोजित इ एम आर एस. राष्ट्रीय कला उत्सव 2024 मध्ये पारंपारिक कथा कथन या कला प्रकारात देशपातळीवरील प्रथम क्रमांक पटकावून महाराष्ट्राची मान उंचावली आहे. अथक परिश्रम आणि एकलव्य विद्यालयासाठी सतत धडपडणाऱ्या प्राचार्य श्रीमती राधिका गोलटकर व सर्व शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनात आणि कर्मचारी वृंदाच्या संयुगांनी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल सहस्त्रकुंड चे चार विद्यार्थी नाशिक येथील राज्यकल्ला उत्सवात प्रथम क्रमांकावर येऊन महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत ओरिसा भुनेश्वर येथील राष्ट्रीय कला उत्सव 2024 मध्ये सहभागी झाले होते, बडा पेन नावाची पारंपारिक कथा पूजा आणि सिद्धांत या...
error: Content is protected !!