लोहा| शासनाचा १५ मार्चचा संच मान्यता व ५ सप्टेंबर रोजीचा मानधनावर शिक्षक नेमणूकिच जी आर रद्द करावा या व अन्य मागण्यासाठी आज २५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या भव्य मोर्चात शिक्षकांनी सामूहिक रजा देऊन सहभागी व्हावे व आपली ताकद सरकारला दाखवावी असे आवाहन


प्राथमिक शिक्षकाच्या अनुशंगाने सरकार वेगवेगळे आदेश काढत आहे. १५ मार्चचा संचमान्यतेचा तसेच ५ सप्टेबरचा मानधनावर नेमणूक जीआर रद्द करावा. यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने आयोजित एक दिवसीय प्रासंगिक रजा देवून मुकमोर्चात शाळा बंद ठेवून सहभागी व्हावे कलामंदिर ते जिल्हाधिकारी असा मोर्चा निघणार असून, अकरा वाजता कलामंदिर येथून सुरुवात होणार आहे. तेव्हा मोठ्या संख्येने तालुका, जिल्हयातील , पदाधिकारी शिक्षक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाबुराव फसमले यांनी केले आहे.




