किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट माहूर विधानसभा मतदार संघातील गाव भेटी देत असताना माजी आमदार प्रदीप नाईक यांनी समाज बांधवांना संवाद साधत असताना कापसावर हंगामाच्या काळात बोंड अळीचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे या हंगामात शेतकऱ्याचा फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
त्याचप्रमाणे ज्या ज्या वेळेस विधानसभेची निवडणूक लागते त्या त्यावेळेस आपल्या समाजामध्ये फूट पाडण्यासाठी विरोधकाकडून बोंडआळी सोडण्यात येते ही बोंड आळी समाजातील प्रभावी उमेदवारला पाडण्यासाठी व मताचे विभाजन करण्यासाठी नेहमी तयार असते. अशा पद्धतीने समाजामध्ये शिरकाव करणाऱ्या बोंड आळी ला आवर घालण्यासाठी समाजातील नाईक कारभारी पुढाऱ्यांनी सामोरे यावं व मतदारांनी सुद्धा त्यांना धडा शिकवावा अशा स्वरूपाचे उदगार माजी आमदार प्रदीप नाईक यांनी गावभेटी दरम्यान तांडा वस्ती पाड्यावर भेटीगाठीवर भर देत असताना काढले.
नुकतेच कंचली ,गोंडेमहागाव मारला गुंडा ,तोटंबा, दयाळ धानोरा तांडा, दिपला नाईक तांडा ,मानसिंग नाईक तांडा, गोंड जेवली सह तालुक्यातील अनेक तांड्यांना भेटी देत असताना आपले मत मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. व मला या विधानसभेत तिकीट मिळणार नाही अशा स्वरूपाचा खोटा अपप्रचार ही विरोधकांकडून केल्या जात आहे . या बाबीवर कुठलेही लक्ष समाज बांधवांनी देऊ नये खोट्या अफवावर विश्वास ठेवू नये कारण महाविकास आघाडी कडून शरद चंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादीकडून मीच उमेदवार राहणार याची खात्री त्यांनी समाज बांधवांना दिली. व पक्षातील कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे व पक्ष बळकट करण्यासाठी सदैव तत्पर राहावे अशा स्वरूपाचे भावनिक आव्हान माजी आमदार प्रदीप नाईक यांनी यावेळी केले.
यावेळी कपिल नाईक , दत्तराव मोहिते ,बंडू नाईक, बालाजी बामणे ,मनोज राठोड , स्वप्निल राठोड, शिवराम जाधव ,शिवाजी बोटेवाड, डॉक्टर भगवान गंगासागर, दिलीप जमादार श्रीराम राठोड, बंडु उरे, अर्जुन जाधव,बाळासाहेब शेरे, जब्बार शेख ,संतोष जाधव, अन्वर शेख संतोष जाधव, रुपसिंग राठोड ,बंटी आडे ,मनोज राठोड, गणेश मोतेवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते या भेटीदरम्यान उपस्थित होते.