Homeकरियरeducational work : शैक्षणिक कार्यासाठी प्रथम संस्थेने स्वयंसेवकांना दिले प्रशिक्षण -NNL

educational work : शैक्षणिक कार्यासाठी प्रथम संस्थेने स्वयंसेवकांना दिले प्रशिक्षण -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे| प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मार्फत किनवट ऑफिस मध्ये स्वयंसेवकांना प्रशिक्षण घेण्यात आले. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मार्फत किनवट तालुक्यातील 25 गावांमध्ये आमचे गाव उपक्रम चालू आहे. त्यातील 8 गावातील 15 स्वयंसेवक प्रशिक्षणासाठी उपस्थित होते.

यादरम्यान प्रथम संस्थेचे जिल्हा समन्वयक अनंता वायसे यांनी स्वयंसेवकांना प्रथम काय काम करते. आणि आमचे गाव उपक्रम याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. प्रथमचे प्रतिनिधी गावात काय काम करते. या बद्दल चर्चा करण्यात आली. गावामध्ये स्वयंसेवक म्हणून तुमची भूमिका काय असेल. या बद्दल त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच इयत्ता पहिली व दुसरी, तिसरी व पाचवी यांच्यासोबत शाळेमध्ये काय काम केल्या जाते. तसेच गावामध्ये इयत्ता तिसरी ते पाचवी व सहावी ते आठवीच्या सोबत गटात कोणकोणत्या कृती केल्या जातात. मुलांचा पाया मजबूत होण्यासाठी माता गटांची बांधणी करण्यात आली. यामध्ये मुलांची चाचणी कशा प्रकारे घेतली जाते. या बद्दल त्यांना सांगण्यात आले. नंतर त्या चाचणी नुसार मुलांचे गट कसे तयार केले जाते. त्या पासून मुलांना कसा फायदा होतो. या बद्दल त्यांना सांगण्यात आले.

कॅम्पमध्ये आपण मुलांसोबत कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी घेतो. याबद्दल मार्गदर्शन केले .त्याच्या सोबत काही ऍक्टिव्हीटी डेमो स्वरूपात घेण्यात आल्या. त्यांना कॅम्प मध्ये व चिल्ड्रन ग्रुपला साहित्य कशी वापरायला द्यायचे हे समजून सांगण्यात आले. चिल्ड्रेन क्लबला आपला कसा फायदा होईल. या बद्दल त्यांना सांगण्यात आले. स्वयंसेवकांच्या प्रश्नांचे निराकरण केले. यासाठी प्रथमचे प्रतिनिधी खेमराज उपासे, अक्षीता नंदनवार, अनामिका रंगारी, समीक्षा कुळमेथें यांनी स्वयंसेवकांना सहकार्य केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments