नांदेड| जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक शिक्षिकांना विद्यार्थ्यांना विविध विषयांमध्ये रुची निर्माण करून त्यांना शिस्त लागावी या साठी विजयनगर येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी स्काऊट व गाईड यांच्या सात दिवशीय प्रशिक्षणाचे उद्घाटन धर्माबाद येथील गटशिक्षणाधिकारी संग्राम कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विजयनगर नांदेड सोसायटीचे अध्यक्ष संभाजीराव शिंदे, बालाजी रोडगे जिल्हा समादेशक व शिबिर प्रमुख रमेश फुलारी सर , शिवकाशी तांडे मॅडम, जनार्दन इरले, हेमंत बेंडे, श्रीमतीज्योतीताई शिंदे,विनोद सोनटक्के, सतीश वाकोडे, श्रीमती मंजुळा जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री कांबळे म्हणाले की शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या शिस्तीचा पाया असून स्काऊट व गाईड यांच्या प्रशिक्षण शिबिरातून विविध कलागुणांच्या अविष्काराने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो व पुढे ते शिस्तीने आपल्या क्षेत्रात यशस्वी होण्यास साठी प्रयत्न करतात. शिक्षकाच्या मनमोकळ्या व विद्यार्थ्यांमधून मिळून मिसळून वागण्याने विद्यार्थी शिक्षकाच्या जवळ येतात.
स्काऊट गाईड आदींच्या प्रशिक्षणातून हे सर्व घडत असते त्यामुळे या प्रशिक्षणाचा वापर नक्कीच नांदेड जिल्ह्यातील सर्व शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना जगामध्ये अवल बनवण्यासाठी प्रयत्न होत राहतील अशी मला हमी आहे. यावेळी शिबिर प्रमुख श्री रमेश फुलारी व श्रीमती शिवकाशी तांडे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद सोनटक्के यांनी केले तर आभार प्रदर्शन वाकोडे यांनी केले. कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची उपस्थिती होती.